23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडदेगलुरात अवैद्यरित्या बायोडिझेलची विक्री

देगलुरात अवैद्यरित्या बायोडिझेलची विक्री

एकमत ऑनलाईन

देगलुर : बायोडिझेलच्या धुरातून बाहेर पडणारे कार्बन चे बारीक कण हवेत प्रदूषण घडवतात तसेच डिझेलच्या धुरातून येणारे गंधक घशाच्या आजारांचे प्रमाण वाढवतो अशा आरोग्यहानीकारक अवैध बायोडिझेलची शहरात दिवसाढवळ्या चारचाकी वाहनात भरले जात आहे .या गंभीर बाबीकडे देगलूर पोलिसांचे ह्लअर्थपूर्णह्व दुर्लक्ष होत आहे .या बाबीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लक्ष देऊन तात्काळ हा जीवघेणा गोरखधंदा बंद करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यापासून देगलूर हैदराबाद मेन रोड वरील मदनुर नाका जवळील न्यू अमरदीप हॉटेल च्या शेजारी असलेल्या एका टीन शेडमध्ये अवैध बायोडिझेल चा मोठ्या प्रमाणात अवैध साठा केला आहे .सदरील डिझेल हे तेलंगणातील जहिराबाद येथून कमी दरात आणले जाते आणि शहरातील काही ट्रॅव्हल्स आहेत त्या ट्रॅव्हल्स मध्ये तसेच मेन हायवेवर चालणा-्या ट्रक व ट्रॅक्टर मध्ये भरदिवसा भरले जात आहे.

ओरीजनल बायोडिझेल चे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डिझेल सारखे असतात , मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतील प्रदूषण होत नाही. यासाठी महाराष्ट्र सरकारने पेट्रोलियम डिझेलेला पर्याय म्हणून बायोडिझेला परवानगी दिली विशेष म्हणजे शासनाचे बायोडिझेल तेल हे वनस्पतीजन्य असल्याने हा नैसर्गिक व पारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे त्यामुळे बायो डिझेल इंजिन ह जास्त ताकतीचा टोला टॉर्क देऊ शकतात त्यामुळे मालवाहतुकीचे ट्रक व ट्रॅक्टर मध्येही त्याचा वापर होतो शिवाय मोटारीमध्ये ही डिझेल चा उपयोग होतो त्यातल्या त्यात एक लिटर मध्ये या गाड्या जास्त धाव घेतात असा या मागचा उद्देश होता मात्र या बायोडिझेल मध्ये मिश्रित असा अवैध बायोडिझेल बाजारात खुलेआम पणे विक्री केली जात आहे.

हे बायोडिझेल ओरिजनल आहे की डुप्लिकेट हे तपासणीसाठी उद्यापर्यंत शासन स्थानावरून कोणतेही पावले उचलले गेले नाहीत त्यामुळेच अवैध बायोडिझेल विक्री करणा-या माफियांचे चांगभलं होत आहे यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही कुचकामी ठरत आहे विशेष म्हणजे येथील पोलिस प्रशासन या अवैद्य बायोडिझेल वाल्याकडून दरमहा पाच अंकी रक्कम उकळून मुग गिळून गप्प आहेत अशा आरोग्य हानिकारक बायोडिझेलची दिवस-रात्र शहर व परिसरात खुलेआम पाणी विक्री केली जात आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष एक पथक पाठवून शहरातील मदनुर नाका , बाजारपेठेतील ईदगा मैदानाजवळ व शासकीय विश्राम घरासमोर ,खानापूर फाटा अशा विविध भागात गोपनीय पडताळणी केल्यास सत्याचा बिंग फुटेल हे विशेष होय….!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या