29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home नांदेड वाळकीत अवैध दारू विक्री

वाळकीत अवैध दारू विक्री

एकमत ऑनलाईन

हदगाव : तालुक्यातील वाळकी बाजार .वाळकी फाटा.आणि हरडफ फाटा येथे अवैध देशी दारूवाल्यानी कहर केला आहे.कोणत्याही महापुरुषाच्या दिवशी तालुक्यात या तीन ठिकाणी अवैध देशी दारू मिळत असल्याने शहरातील मद्यपी मद्यप्राशन करण्यासाठी या तीन ठिकाणी एकच गर्दी करीत असल्याचे दिसून आले.शुक्रवारी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात तालुक्यात साजरा झाला या जयंतीच्या दिवशी नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन विटनकर यांनी परवाना धारक जिल्ह्यातील सर्व देशी दारूचे अधिकृत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल होते.

जयंतीच्या दिवशी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहावी कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये या साठी जिल्ह्यातील दारू विक्रीचे व्यवहार बंद राहावे म्हणून कडक पाऊले उचली होती.परंतु तालुक्यात परवाना धारक देशी दारूचे दुकान बंद असल्याने तालुक्यातील वाळकी बाजार . वाळकी फाटा.आणि हरडफ फाटा.येथील अवैध देशी दारू धंदेवाल्यानी चांदी करून घेतली आहे.

सण .उसत्व.महापुरुषाच्या जयंत्या असो तालुक्यात या तीन ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा उपलब्ध असते असे मद्यपी कडून बोलल्या जात आहे.या तिन्ही ठिकाणी जयंतीच्या दिवशी मद्यपीने एकच गर्दी केली असल्याचे दिसून आले.तालुक्यात परवाना धारक देशी दारूचे दुकानबंद असून सुद्धा या तीनही ठिकाणी देशी दारूचा साठा येतो कुठून ? यांना देशी दारूचा माल कोण पोहचवीतो ? हे सर्व प्रकार पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलीस यांच्या कडे कानाडोळा करीत आहेत.शिवजयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी वैध अवैध देशी दारू बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना तालुक्यातील या तीनही ठिकानाच्या अवैध देशी दारू धंदे वाल्यानी आदेशाचाभंग केला असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाळकी येथील रहिवाशांतुन होत आहे

खबरदार! अफवा पसरवाल तर थेट कारवाई :डॉ. विपीन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या