23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडमन्याड नदीत लिंबोटी धरणाखाली अवैध वाळू उपसा

मन्याड नदीत लिंबोटी धरणाखाली अवैध वाळू उपसा

एकमत ऑनलाईन

लोहा : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रेतीला सोन्याचा भाव आला असून लोहा तालुक्यात गोदावरी नदी नंतर आता वाळू माफियांनी मन्याड नदीकडे मोर्चा वळविला असुन लिंबोटी धरणाच्या खाली मन्याड नदीत वाळू माफियांनी धुमाकाळ घातला असून शासनाचा लाखो – करोडो रुपयांचा महसूल बुडवीत महसूल विभागाच्या अधिकारी – कर्मचा-यांना मॅनेज करून हजारो ब्रास रेतीचा उपसा चालू असुन याकडे तात्काळ जिल्हाधिका-याने लक्ष देऊन वाळू माफियावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी व वाळू माफियांशी मिलीभगत करुन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणा-या व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचा‍र्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

लोहा तालुक्यातील रेती घाटाचे एकही टेंडर सुटले नाही पण अनाधिकृतपणे रेतीचा उपसा जोमात चालु आहे. पेनुर, अंतेशवर, भारसावडा, बेटसांगवी, चित्रावाडी ,सह अनेक गावठाण नदी पात्रातुन रेतीचा उपसा चालु आहे यावर काही वेळेस महसुल विभागाने औपचारिकपणे कारवाई केली आहे ती वर्तमानपत्रात बातम्या आल्यामुळे.पंरतु डोगराळ भागातील लोहयापासुन दुर अंतरावर असणा-्या मन्याड नदीकडे कुणीही येत नाही म्हणून अवैध रेती उपसा व वाहातुकीला रान मोकळे सोडले आहे . यामुळे वाळू माफिया हे लिंबोटी धरणा खालील मन्याड नदीच्या पात्रातुन पोकलॅड चैनच्या जेसीबीद्वारे रेती उपसा करून ट्रॅक्टरवर मोठी चाळणी लावून रेती चाळून , अहमदपूर, उदगीरकडे हायवा टिपरद्वारे वाहतूक करीत आहेत व शासनाला लाखो – करोडो रूपयांचा चुना लावीत आहेत.

सदरील अवैध रेती उपसा व वाहातुकीची माहिती पत्रकारांना मिळाली असता लोहा येथील पत्रकारांनी लिंबोटी धरणाखालील मन्याड नदी पात्रतील अवैध रेती उपसा व वाहातुकीची घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले असता वाळू माफियाला याची चाहुल लागताच त्यांनी घटनास्थळावरून पोकलॅड चैनची जेसीबी व हायवा टिपर हलविले असुन नदीपात्रात शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे व तीन ट्रॅक्टरच्या टाल्या चाळणीसह सोडून पळाले. यावेळी पत्रकारांनी या गावचे तलाठी बोंडावार व भागाचे मंडळाधिकारी भोसीकर यांना मोबाईलद्वारे फोन लावला असता त्या दोघांचाही मोबाईल फोन बंद होता.

त्यानंतर लोहा तहसीलदारांना फोन लावला असता तहसीलदारांनी फोन उचलला नाही व त्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार अशोक मोकले यांना फोन लावला असता ते म्हणाले की सदरील रेती जप्त करण्यासाठी व पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडळाधिकारी यांना सांगितले आहे. तसेच यावेळी या भागातील शेतक-्यांना व नागरिंकांना या अवैध रेती उपसा व वाहातुकी बदल विचारले असता ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून अहमदपूर येथील वाळू माफिया हे रात्रीच्या वेळी मन्याड नदीतुन अवैध रेती उपसा व वाहातुक करीत आहेत व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मॅनेज करीत असल्यामुळे हे प्रकार चालू आहेत असे अनेकांनी सांगितले. यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अर्धापूर तालुक्यात केळी ठरली मजुरांची तारणहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या