18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडपोलीसांच्या मेहरबानीमुळे अवैध धंदे जोमात

पोलीसांच्या मेहरबानीमुळे अवैध धंदे जोमात

एकमत ऑनलाईन

निवघा बाजार : निवघा बाजार सह परिसरातील अनेक गावात निवघा बाजार पोलीसांच्या मेहरबानीमुळे अनेक अवैध्य धंदे जोमात सुरू झाले असून त्यामध्ये विनापरवाना देशी, विदेशी दारू सह गुटखा,मटका,व जुगार अड्डयांचा समावेश आहे. परिसरातील अल्पवयीन व शाळा कॉलेज मधिल तरुण या अवैध्य व्यवसायामुळे व्यसनाधिन होत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.या अवैध धंदे करणा-्यावर पोलीसांचा कोणताही वचक राहीला नसुन पोलीसांच्या हप्तेखोर धोरणामुळे सामन्य माणुस त्रास होत असतांनाही कोणतीही तक्रार करू शकत नाही.

निवघा बाजार परिसरातील शिरड येथे विनापरवाना देशी दारु विक्रि करणारे पाच ते सहा जन आहेत खुले आम देशी व विदेशी दारुची विक्री होते.त्यामध्ये बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद शाळे जवळ,साधुबुवाच्या माळाच्या पायथ्याशी,नवीआबादी परीसर या सह काही किराणा दुकानावर विदेशी दारू मीळत असल्यामुळे अनेक अल्पवयीन मुले दारुच्या व्यसनी गेले आहेत. निवघा बा.परिसरात सर्रास गुटख्याची विक्रि होत असून याकडे दुर्लक्ष होत आहे.परिसरातील निवघा, शिरड, पेवा, करोडी, हस्तरा, बोरगांव, येळंब येथे अनेकजन विनापरवाना अवैध देशी व विदेशी दारू विक्री करीत आहेत. निवघा बा. येथे परवानाधारक देशी दारूचे दोन दुकाने असून विदेशी विक्री बार चे तिन दुकाने आहेत तर बियर शॉपी चार आहेत ड्रॉय डे च्या दिवशी निवघा बा.सह परिसरात अवैध दारू विक्रि मोठया प्रमाणात होत असते, परिसरात धाबे मोठ्या प्रमाणात वाढले असून या धाब्यावरही विनापरवाना देशी व विदेशी दारु विक्री केल्या जाते याकडे स्थानिक पोलीस जानिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड परिसरातील नागरीकांधून होत आहे.

पोलीसांना परिसरातील विनापरवाना अवैध देशी व विदेशी दारू विक्रेत्यांकडून मासीक हप्त्यासह प्रत्येकी एक केसेस ही मीळतात : – याबाबत एका विनापरवाना अवैध देशी दारू विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहीती नुसार निवघा बा. पोलीसांना प्रत्येकी मासीक १५०० रु हप्ता ठरवला असून गावातील नागरीकांची आमच्या बद्ल तक्रार आली तर एक केस द्यावी लागेल अशी बोलनी झाली असून,मी हप्त्या सह केसेस ही दिल्या आहेत ते सर्व सांगुनच असते त्यामध्ये केस कोणती होते ते ही सांगतात दारूचा बॉक्स जरी असला तरी फक्त सात बॉटल पोलीस आम्हाला दयायला सांगतात ते जप्त केल्या हे दाखवण्यासाठी असते नंतर आधारकार्ड मागतात आणि ६५ ई ची केस होते ते आम्हाला सांगुनच एक केस प्रत्येकाला दयावी लागते त्यामध्ये अटकही होत नाही फक्त कायदयानुसार गुन्हानोंद केला जातो. कोन्ही पोलीसांना तक्रार केलीच तर पोलीस कार्यवाही केल्याचे गावातील नागरिकांना दाखवतात अशी गंभीर स्वरूपाची माहीती पोलीसांबद्ल एका शिरड येथील अवैध दारू विक्रेत्यांने नांव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.परिसरातील या अवैध्य धंदयाकडे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी येथील जनतेतून होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या