28.6 C
Latur
Tuesday, May 18, 2021
Homeनांदेडअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा - खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा – खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

जनतेची तळमळ असलेले नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर पुन्हा कोरोनाबाधीत झाले असुन सुध्दा ते विलंगीकरणात आहेत. असे असतांनाही खा.चिखलीकर यांनी जिल्हयात झालेली अतिवृष्टी यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातली असुन जिल्हयातील नुकसान झालेल्या शेतीचे, घराचे पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.

एकमत ऑनलाईन

नांदेड (प्रतिनिधी) : एकीकडे कोरोना महामारी तर दुसरीकडे जिल्हयात पडलेला ढगफुटी सदृश्य पाऊस तसेच झालेली अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती तसेच घर पडझडीच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे अशा सुचना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या असुन जिल्हयात झालेल्या नुकसानीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनी वरुन दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
मागील आठवडयापासुन जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे जिल्हयाच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अधिच संकटात सापडला असुन जनावरांना लंपी अजारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. लंपी अजारामुळे लाखोची जनावरे वाचविण्यात शेतक-यांची तारेवरची कसरत होत आहे यामुळे शेतकरी हा चारही बाजुने संकटात सापडला आहे.
बिलोली, देगलूर,मुखेड, धर्माबाद या तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे घरांच्या पडझडीसह शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेले मुग, उडीद, सोयाबीन यासह अन्य पीके उध्दवस्त झाली आहेत मुखेड तालुक्यातील बेनाळ येथील पाझर तलाव फुटल्यामुळे पाझर तलाव क्षेत्राखालील शेतक-यांच्या जमिनी खरडल्या गेल्या आहेत, जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे धर्माबाद तालुक्यातील करखेली सह जिल्हयाच्या अन्य भागात नागरीकांच्या घरांची पडझड झाली आहे. सुरु असलेल्या पावसामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरले असुन यामध्ये संसारापयोगी साहित्यचे नुकसान झाले आहे. सतत कोसळणा-या पावाने व झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेतीचे, पिकांचे घरांचे मोठे नुकसान झाले असुन प्रशासनाने नुकसान झालेल्या शेती, घराचे तात्काळ पंचनाने करुन आर्थिक मदत द्यावी अशा सुचना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या