25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडलोहा पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

लोहा पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पालिकेकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण या परिसरात काटेरी झुडूप व घाणीचे साम्राज्य जलशुद्धीकरण केवळ देखावा बनले आहे. या केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही तर सुनेगाव तलावातून ओढलेले पाणी केवळ अ‍ॅलम मिसळवून टाकीत भरले जात आहे व तेच अशुद्ध पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पोहोचत आहे.

शहराची लोकसंख्या अंदाजे पंचवीस हजाराच्या वर असून प्रति व्यक्ती दोन दिवआड सत्तर लिटर पाणी दिले जाते नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाणी जलशुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जातात मग शहराचं नशिबाला अशुद्ध पाणी का ? शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत आहे यात नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळच मांडला आहे, असा आरोप होत आहे. असे असले तरी नागरिकांकडून पाणीकराची वसुली व्याजासह केली जात असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती चिड व्यक्त होत आहे.

शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैैनंदिन उपयोगाएवढे पाणी पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. पुरविलेले पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारकनसावे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिका नागरिकांकडून पाणी कराच्या स्वरूपात कर घेते. कोरोना काळातही पालिका प्रशासनाने पाणी,घरपट्टी सक्तीची वसुली सुरूच आहे.पालिकेने पाणी शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला येण्-ाया पाण्याला दुगंर्धीही येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. शहरातील काही बोर बंद अवस्थेत असताना दिसतात त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

रेमडेसिवीर देता का कुणी… रेमडेसिवीर; रूग्णांचे नातेवाईक नटसम्राटच्या भुमिकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या