23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडअर्धापूर तालुक्यात केळी ठरली मजुरांची तारणहार

अर्धापूर तालुक्यात केळी ठरली मजुरांची तारणहार

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : तालुक्यात केळी पिकाचे प्रचंड उत्पादन असून केळी खरेदी – विक्री व्यवहारातून बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल होते. तर ऐन पावसाळ्यात बेरोजगार मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होतो. यातून अधिकचे चार पैसे रोजंदारी मिळते. त्यामुळे केळी हे पिक हजारो बेरोजगार मजुरांची तारणहार बनली आहे.

अर्धापूर तालुका आणि परिसरातील केळीचे साम्राज्य आजही टिकून आहे. पावसाळ्यात शेतीसह अनेक क्षेत्रातील रोजंदारीची विविध कामे बंद होतात. त्यामुळे हातावर पोट असणा-या अनेक गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अशा वेळी भर पावसात शेतातील केळीच्या घडांची डोक्यावर वाहतूक करून रोडवर आणण्यासाठी हजारो मजुरांची गरज असते. तसेच गाडी भरून देण्यासाठी, माल छाटणे, वजन करणे, पट्टी लिहीणे अशी अनेक कामे करण्यासाठी चांगली मजुरी दिली जाते. या केळी पिकामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना रोजगार प्राप्त झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

अशा प्रकारे बेरोजगारांना रोजगार देणारी केळी ही मजुरांचा तारणहार ठरली आहे. तालुक्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून येथील केळी परप्रांतात गेली नाही. आणि बाहेरचे व्यापारी सुध्दा येथे येवू शकले नसल्यामुळे केळीचे भाव पडले होते. तरीही मजुरांना रोजगार उपलब्ध होता. अशा परिस्थितीत केळी उत्पादक शेतकरी चिंतेत असताना गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन शिथिल झाले आणि केळीच्या मागणीत वाढ होवून भावातही चांगली सुधारणा झाली आहे. सद्यस्थितीत केळीच्या खरेदी – विक्री व्यवहारातून अर्धापूर केळी बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल होत आहे.

त्याचा सकारात्मक परिणाम मजुर, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, हमाल, वाहनधारक यांच्या उत्पन्नावर होत असून बाजारात अर्थिक सुबतता आली आहे. तालुक्यातील शेती ही शंभर टक्के बागायती असून येथील शेतजमीनीला उर्र्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी मिळते. शिवाय शेतजमीन सुपिक असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. येथील केळी उत्तर भारतातील दिल्ली, जम्मू, काश्मीर, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब व राजस्थान तर दक्षिण भारतातील तेलंगणा, ओडिशा व आंध्र प्रदेश या राज्यासह विदेशात निर्यात केली जाते. तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली, अकोला, नागपूर अशा अनेक जिल्ह्यात अधार्पुर तालुक्यातील केळीची निर्यात सुरू आहे. अधार्पुर तालुक्यातील केळी ही खाण्यासाठी चविष्ट व टिकाऊ असल्यामुळे या केळीला सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

तालुक्यात दरवर्षी केळीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत असून मागील दोन वर्षांपूर्वी येथे १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड होत होती. परंतु आज मितीला सिंचनाची सुविधा वाढत असल्याने केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ होवून ती १९ ते २० हजार हेक्टर झाली आहे. अधार्पुर तालुक्यातून दर दिवशी ३०० ते ४०० गाड्याची केळी निर्यात केली जाते. तर अधार्पुर शहरात एकूण तीन शीतगृहे आहेत. यात शिल्लक माल साठवला जातो. येथेही मोठ्या प्रमाणात मजुर काम करतात. त्यामुळे अधार्पूर तालुक्यात केळी हिच मजुरांची तारणहार ठरली आहे. असे मजूर, कामगार वगार्तून बोलल्या जात आहे.

गत वर्षी मी माज्या शेतात ४ हजार ५०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. यंदा जुलै महिन्यात केळीच्या घडाची कापणी सुरू झाली असून दोन आठवड्यात १७ ते १८ टनाच्या पाच गाड्या भरवून पाठवल्या आहेत. यंदा प्रथमच केळीला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून ४ हजार ५०० झाडामध्ये १२ ते १३ लाख रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
-गोविंदराव मरकुंदे
शेतकरी

केळीचे उत्पादन हे पावसाळ्यात सुरू होते. यावेळी शेतातील इतर कामे संपलेली असतात. परंतु केळीची वाहतूक, छाटणी, वजन करणे, पट्टी लिहीणे, पॅकिंग करणे आदी कामे मजुराकडूनच केली जातात. या रोजगारातून आम्हाला कमी वेळेत जास्त मजुरी मिळते. नियमित कामे असल्यामुळे आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पध्दतीने भागतो.
-केशव कांबळे
मजूर

राजस्थान काँग्रेसमधील कलह निवळणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या