24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडधर्माबाद तालुक्यात,३७ टक्के लसीकरण पूर्ण

धर्माबाद तालुक्यात,३७ टक्के लसीकरण पूर्ण

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : धमार्बाद तालुक्यात प्रशासन व जनता यांच्यातील समनवयातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून प्रशासनाचे योग्य नियोजन व जनतेची साथ यामुळे आतापर्यंत 37 टक्के लसीकरण पूर्ण झाले झाले असून शहर व ग्रामीण भागातील सुमारे १२ हजार ६०० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तसेच तालुकास्तरीय कोविडसेंटर मध्ये वेळेवर यथोचित उपचार मिळत असल्याने अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगात होती.या संसर्गजन्य विषाणूचा ग्रामीण भागात देखील प्रवेश झाला होता.त्यामुळे पहिल्या लाटेत जी गावे कोरोनापासून दूर होती त्या गावातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंतेत वाढ होत होती.

याच वेळी तहसीलदार दतात्रय शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ इक्बाल शेख व गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांच्या योग्य नियोजनातून वेळीच सकारात्मक निर्णय झाला व जनतेनी त्यात योग्य साथ दिल्याने सध्यास्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. कोरोना नियंत्रित झाला असला तरी संकट अद्यापही कायम असल्याने आणखी काही दिवस नियम पाळणेच सर्वांसाठी योग्य राहणार आहे.

ग्रामीण भागात लसीकरण संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने तहसीलदार दतात्रय शिंदे यांनी महसूल विभागाचे तलाठी,ग्रामसेवक,व आरोग्य उपकेंद्र स्तरावरील कर्मचारी यांचा योग्य समनवय जुळविल्याने ग्रामीण भागात वय वर्ष ४४ते ५९ पर्यत च्या ३७५५,वय वर्ष ६० पेक्षा अधिक असलेल्या ३०८६ ,नागरिकांचे व १२७आरोग्य कर्मचारी व ३०३ फ्रंटलाईन वर्कर असे मिळून ७२५१जणांचे लसीकरण ९ आरोग्य उपकेंद्र, एक नागरी दवाखाना व एक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हे लसीकरण करण्यात अल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक खंदारे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली व लसीकरण चे महत्व पटवून देण्यास प्रशासनाला यश आल्याने लसीकरण मोहिमेत नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.आता १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना ही लस मिळणार आहे. लस ज्या पध्दतीने उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून प्रतिदिवशी कमीत कमी ४ ते ५ गावे पूर्ण करण्यावर प्रशासन भर देणार आहे. ग्रामीण भागासह शहरातील लसीकरण केंद्रावर देखील नागरिक प्रतिसाद देत आहेत ही बाब सकारात्मक आहे. कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी लसीकरण झालेल्या नागरिकांसह सर्वांनी प्रशासकीय नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे असे तहसीलदार दतात्रय शिंदे म्हणाले.

लातूर जिल्ह्यात आयुष उपचाराचे पहिले कोविड केअर सेंटर सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या