24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडधर्माबाद तालुक्यात केवळ २१ हजार जणांनी घेतली लस

धर्माबाद तालुक्यात केवळ २१ हजार जणांनी घेतली लस

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : प्रशासनाच्या नियोजनबद्धतेमुळे धर्माबाद तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहर व ग्रामीण मिळून तालुक्यातील जवळजवळ २१ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून ग्रामीण भागात गावोगावी व शहरी भागात वार्डनिहाय लसीकरण आयोजित करण्यात येत असल्याने नागरिकांना लसीचे महत्व पटत आहे व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

तालुक्यात लसीकरण सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला त्यामुळे नागरिकांच्या मनात लसी संदर्भात असलेले गैरसमज दूर करून लसीकरण चे महत्व पटवून देणे गरजेचे बनले होते. लसीकरण मोहिम गतीमान करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनातिल देखील तहसीलदार दतात्रय शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे ,शहराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ इक्बाल शेख यांनी लसीकरण मोहिमेचे महत्व पटवून देण्यावर भर घातला तसेच नागरिकांना लसीकरण केंद्रावर येण्यासाठी अडचणी येत असल्याचे लक्षात येताच शहरात वार्डनिहाय लसीकरण आयोजित केले व ग्रामीण भागात गावोगावी आरोग्य उपकेंद्र व स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला या मोहिमेत सहभागी करण्यात आले असल्याने दुस-या टप्प्यात मात्र लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने आतापर्यत ग्रामीण भागातील ११८२२४ तर शहरातील सुमारे ९५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

तालुक्यातील एक प्राथमिक आरोग्यकेंद्र,एक नागरी दवाखाना व इतर उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण होत आहे.दुस-या लाटेत कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला होता यामध्ये ग्रामीण भागातील सुमारे ४२ गावातील सुमारे १५४७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे तर तालुक्यातील एकूण ४५ गावापैकी ४२ गावात कोरोनांने शिरकाव केला होता तर नेरली ,हसनाळी व मनूर या तीन गावात एकही रुग्ण आढळून आला नाही आज स्थितीत ही गावे कोरोनामुक्त असून २९ में नंतर ग्रामीण भागातील एकही व्यक्ती कोरोना बाधित झाला नाही अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक खंदारे यांनी पुढारी शी बोलताना दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण बाबतीत तालुका आरोग्य विभागाने केलेले नियोजन उपयुक्त ठरत आहे विशेष म्हणजे वय १८ ते ४४ या लसीकरण मोहीमें अंतर्गत युवकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. शहर व तालुक्यातील लसीकरण पूर्ण करण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्याच गावात लस मिळत असल्याने नागरीकातून प्रशासनाच्या नियोजनाचे कैतुक होत आहे. कोरोनाचा नवा व्हर्जन डेल्टाप्लसच्या अनुषंघाने प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वेळीच उपाययोजना करण्यावर भर दिला आहे आणि त्यातही प्रामुख्याने सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी भर दिला जात आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दजेर्दार व गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ.पदमाताई रेडी यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रास भेटी देऊन आढावा घेतला आहे व स्थानिक आरोग्य विभागाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या