22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात ११५७ व्यक्ती कोरोना बाधित, २५ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात ११५७ व्यक्ती कोरोना बाधित, २५ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४ हजार २८७ अहवालापैकी १ हजार १५७ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ९१७ तर अँटिजेन तपासणीद्वारे २४० अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ७० हजार ४१९ एवढी झाली असून यातील ५७ हजार ७६१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १४ हजार १०० रुग्ण उपचार घेत असून २१० बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक १८ ते २० एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २९७ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.७६ टक्के आहे. रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-२१०. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४५८ , नांदेड ग्रामीण १६, अर्धापुर ७४, भोकर २, बिलोली ४, देगलूर ६०, धर्माबाद २८, हिमायतनगर ५, कंधार ७३, किनवट १८, लोहा ३३, मुखेड ५, मुदखेड ३०, नायगाव २८, उमरी २५, हदगाव ५५, हिंगोली २, यवतमाळ १, असे एकूण ९१७ बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ७०, नांदेड ग्रामीण ३, अर्धापुर ७, भोकर ३, बिलोली २, देगलूर ६, धमार्बाद २, हदगाव १८, हिमायतनगर ७, कंधार १०, किनवट १२, लोहा ४, माहूर ८, मुदखेड २८, मुखेड ५, नायगाव ३४, उमरी ७, परभणी २, लातूर १, यवतमाळ १, हिंगोली ९, पुणे १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे २४० बाधित आढळले.

आज १ हजार १५ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ३८९, बिलोली तालुक्याअंतर्गत १०१, नायगाव तालुक्यातंर्गत १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १९, मुखेड कोविड रुगणालय ९२, कंधार तालुक्याअंतर्गत २०, माहूर तालुक्यातंर्गत १२, अर्धापुर तालुक्यातंर्गत ४५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १५, हदगाव कोविड रुग्णालय ६०, भोकर तालुक्यातंर्गत ९९, हिमायतनगर तालुक्यातर्गंत ३२, लोहा तालुक्यातर्गंत ३६, खाजगी रुग्णालय ७५ यांचा समावेश आहे.

राजकारणाचा विषाणू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या