24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात ३५ कोरोना बाधितांची भर कोरोना तर चौघांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात ३५ कोरोना बाधितांची भर कोरोना तर चौघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात ४८ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ३५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर सलग दुस-या दिवशी उपचार घेणा-या चौघांचा मृत्यू झाला आहे.

एकुण ८५६ अहवालापैकी ८०२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १९ हजार ४४३एवढी झाली असून यातील १८ हजार ३४५ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण४०१बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील २५बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार चार रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५२९झाली आहे. शनिवार ७ नोव्हेंबर रोजी खाजगी रुग्णालयात राज कॉर्नर नांदेड येथील ७५ वषार्चा एक पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील बोरगाव येथील ७०वषार्चा एक पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे लोहा तालुक्यातील डेरला येथील ५५वषार्चा एक पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे भोकर येथील ४५ वषार्चा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ७ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५ किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण २, मांडवी अंतर्गत कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १ खाजगी रुग्णालय १०, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १४, अधार्पूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ६ असे एकूण ४८बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २२ अधार्पूर तालुक्यात १, उमरी १, लोहा१ कंधार १ असे एकुण २६ बाधित आढळले.

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरात १४७ कोरोनाबाधितांचा शोध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या