नांदेड: कोरोना अहवालानुसार ४३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २८ तर अॅटिजेन किट्स तपासणीद्वारे १८ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ४0 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी
देण्यात आली आहे.
आजच्या १ हजार ३८ अहवालापैकी ९५२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २0 हजार ५५९ एवढी झाली असून यातील १९ हजार ४७६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३३९ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १३ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५५0 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १ , मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १८, हदगाव कोविड रुग्णालय १, खाजगी रुग्णालय ७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५, मुखेड कोविड रुग्णालय ६, देगलूर कोविड रुग्णालय २ असे एकूण ४0 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १७, लोहा तालुक्यात २, वसमत १, नांदेड ग्रामीण १, बिलोली ३, यवतमाळ १ असे एकुण २५ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १२, लोहा तालुक्यात ३, मुदखेड १, कंधार २ असे एकुण १८ बाधित आढळले. जिल्ह्यात ३३९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ३३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ३३, मुखेड कोविड रुग्णालय २0, किनवट कोविड रुग्णालय २, हदगाव कोविड रुग्णालय २, देगलूर कोविड रुग्णालय २, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७५, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १३४, खाजगी रुग्णालय १९ आहेत.
शनिवार ५ डिसेंबर रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १८४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७५ एवढी आहे.
लातूर जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९५.३९ टक्क्यांवर