29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात ५३७४६ जणांची कोरोनावर मात

नांदेड जिल्ह्यात ५३७४६ जणांची कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या महिन्याभरापासून नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा उदे्रक वाढला आहे.दररोज रूग्ण संख्या वाढत आहे.मात्र यात उपचाराअंती जिल्हयात आतापर्यंत ५३ हजार ७४६ जणांची कोरोनावर मात केली आहे.तर १२७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोच्या दुसरी लाट तीव्र झाली आहे.यामुळे गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा जिल्हयात उदे्रक सुरू आहे.हजार ते आठराशे पर्यंत दररोज नव्या रूग्णांची भर पडत आहे.महापालिका क्षेत्रातील रूग्ण संख्येत आता काहिशी घट झाली आहे मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात रूग्ण वाढत आहेत.यामुळे सर्वांची चिंता वाढती आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेतग़र्दी कमी व्हावी यासाठी बाजारपेठ व किराणा दुकाने,बेकरी,भाजी मार्केट आदी दुकाने आज सोमवार पासून केवळ दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देत दिवसभर ते बंद ठेवण्याचे निर्बंघ घातले आहेत.रविवारी प्राप्त झालेल्या ५ हजार ६६५ अहवालापैकी १ हजार २८७ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७२९ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५५८ अहवाल बाधित आहेत. तर सोमवारी १३७५ जण नवे बाधीत आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६९२६२ एवढी झाली असून यातील ५३७४६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

आतापर्यंत एकुण घेतलेले ४ लाख १८ हजार १९१ स्वॅब घेण्यात आले आहेत. यात ३ लाख ४0 हजार ८६३ निगेटिव्ह स्वॅब आले आहेत. तर एकुण मृत्यू संख्या १ हजार २७२ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.५९ टक्के झाले असून रुग्णालयात १३ हजार ९८३ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. यापैकी १९३ रुग्णांची अतिगंभीर अवस्था बनली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर सोमवारी मृत्यूची संख्या घटली आहे. मात्र बाधीत रुग्णांची संख्या वाढली आहे.

ग्रामीण रोजगार आणि अर्थव्यवस्था

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या