34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात पुन्हा ६९ व्यक्ती पॉझिटिव्ह

नांदेड जिल्ह्यात पुन्हा ६९ व्यक्ती पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रूग्ण संख्येचा वेग वाढला आहे.बुधवारी आलेल्या कोरोना अहवालानुसार पुन्हा ६९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. एकुण १ हजार ४७४ अहवालापैकी १ हजार ३८५ निगेटिव्ह आले आहेत. यामुळे नांदेडकरांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.तर गंभीर रूग्णाचा मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे.बुधवारी आलेल्या अहवालात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १९ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ५० बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ५० कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या १ हजार ४७४ अहवालापैकी १ हजार ३८५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ९०६ एवढी झाली असून यातील २२ हजार ४३५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ६५५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील २० बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविडमुळे जिल्ह्यातील ६०२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १०, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १९, देगलूर कोविड रुग्णालय २, खासगी रुग्णालय १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ५, किनवट कोविड रुग्णालय २, हदगाव कोविड रुग्णालय २ असे एकूण ५० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९३.८५ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ६, हिमायतनगर तालुक्यात २, मुदखेड १, किनवट ७, लोहा १, हिंगोली २ असे एकुण १९ बाधित आढळले. अ‍ॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३0, अधार्पूर तालुक्यात १, माहूर २, मुखेड २, किनवट ७, नांदेड ग्रामीण १, देगलूर २ , मुदखेड १, लोहा ३, धुळे १ असे एकूण ५0 बाधित आढळले. जिल्ह्यात ६५५ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ४३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ७७, किनवट कोविड रुग्णालयात २४, मुखेड कोविड रुग्णालय ७, हदगाव कोविड रुग्णालय ६, महसूल कोविड केअर सेंटर ५२, देगलूर कोविड रुग्णालय ९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २५६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १0५, खाजगी रुग्णालय ७६ आहेत. बुधवार ३ मार्च २0२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १४२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २८ एवढी आहे.

उद्धव ठाकरेंनी सैनिकांचा अपमान केला; खंडणीखोरांना समर्पणनिधी कसा समजणार? -देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या