34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात ७५ व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात ७५ व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड: कोरोना अहवालानुसार ७५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ५० तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २५बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ४६कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. १ हजार ५५३ अहवालापैकी १ हजार ४०३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ८एवढी झाली असून यातील २२ हजार १७७ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ४९४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १६ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

बुधवार २४ फेब्रुवारी रोजी शास्त्रीनगर नांदेड येथील ५९ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे तर शुक्रवार २६फेब्रुवारी रोजी लोहा तालुक्यातील कलंबर येथील ७४ वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आजपर्यंत कोविड-१९मुळे जिल्ह्यातील ५९७व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ४ मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २७, गोकुंदा कोविड रुग्णालय ४ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १ मुदखेड तालुक्यातर्गत ४खाजगी रुग्णालय ६ असे एकूण ४६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.४३ टक्के आहे.

एसटीत गळफास घेऊन वाहकाने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या