23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ६६१ रूग्ण वाढले

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ६६१ रूग्ण वाढले

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाच्या रूग्णांत आठवडाभरापासून घट सुरू होती.मात्र नव्या रूग्णांचा किचींत आलेख वाढला असून गुरूवारी ६६१ रूग्णांची वाढ झाली आहेक़ोरोना बाधेतून मुक्त झालेल्या १२७३ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. तर १७ जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. कोरोनाच्या गुरूवारी आलेल्या अहवालानुसार दि. ४ मे रोजी १ रुग्णांचा मृत्यू झाला. दि. ५ मे रोजी १४ रुग्णांचा मृत्यू आणि ६ मे रोजी ०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा कोवीड रुग्णालय नांदेड येथे मुखेड पुरुष वय ७५,कोपरा ता.नायगाव महिला ५०, नायगाव पुरुष ७५,बा-हाळी ता.मुखेड महिला ५२,बारुळ ता.कंधार पुरुष ५५,हिंगोली गेट महिला ८५,सिडको पुरुष ६३,देगलूर रुग्णालयात राजुरा ता.मुखेड महिला ६५,श्रीगणेशा रुग्णालयात गवळीपुरा नांदेड पुरुष ८०,भगवती रुग्णालयात श्रीनगर नांदेड पुरुष ५९,फिनिक्स रुग्णालयात डोंगरगाव पुरुष ७०,व्हिजन रुग्णालयात उंचेगाव ता.हदगाव पुरुष ६५,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे मुखेड पुरुष ६४,धमार्बाद पुरुष ४५,लोहा पुरुष ४२,अधार्पूर पुरुष ५७,उमरी पुरुष ४६,असे १३ पुरुष आणि ०४ महिला मिळून एकूण १७ रुग्णांचा कोरोना बाधेने मृत्यू झाला आहे.

त्यामुळे आज पर्यंत कोरोना बाधेने मरण पावणा-या रुग्णांची संख्या १६६८ झाली आहे. शासकीय रूग्णालय विष्णुपूरी-१५,मनपा अंतर्गत विलगीकरण व जम्बो कोवीड सेंटर -८०९, धमार्बाद-१२, देगलूर-०५, अधार्पूर- ३०, उमरी-३२, माहूर-१५, जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल नांदेड -१३, मुखेड -१९,मुदखेड-१२, किनवट-४६, हिमायतनगर-०५, बिलोली-६१, आयुर्वेदिक महाविद्यालय -०८, कंधार-०६, लोहा-२२,बारड-०२,खाजगी रुग्णालय -११५, नायगाव-०२,भोकर-४४,अशा एकूण १२७३ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७४८३८ झाली आहे. उपचाराने बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८९.५६ टक्के आहे.

आज प्राप्त झालेल्या ३३७८ अहवालांमधील २६७४ अहवाल निगेटीव्ह आहेत, ६६१ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ८३५५९ एवढी झाली आहे. यात आरटीपीसीआर तपासणीमध्ये ५५५ आणि अँटीजेन तपासणीमध्ये १०६ असे एकूण ६६१ रुग्ण आहेत.आजच्या ६६१ रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात १९९ रुग्ण आहेत. आज स्वॅब तपासणी ४०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब २७ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब १६ आहेत. आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -१७७, बिलोली-१५, लोहा-२५,हिमायतनगर-११,उमरी-०५, नांदेड ग्रामीण -१३, कंधार-३०, मुदखेड-१२, परभणी-३, अधार्पूर-१४, मुखेड-२५,भोकर-३, हदगाव-४०,नायगाव -२४, हिंगोली-१७, यवतमाळ-२,बिदर-३,धमार्बाद-३६,किनवट-५२,देगलूर-४६, लातूर-२,असे ५५५ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या अ‍ॅन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -२२, माहूर-०५, हिमायतनगर-१, मुखेड-१३, नांदेड ग्रामीण-२, देगलूर-२६, नायगाव-४, अधार्पूर-३, धमार्बाद-२१, किनवट-१०, भोकर-४, हदगाव-४, लोहा- ३, िंगोली-४, कंधार-२, किनवट-९, हदगाव-४, लोहा-६, यवतमाळ-३, भोकर-१, चंद्रपूर-१, असे एकूण १०६ रुग्ण आहेत.

विनाकारण फिरणा-या नागरिकांची ‘कोरोना’ चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या