26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home नांदेड नांदेड जिल्ह्यात आज ४४ पॉझिटिव्ह तर ८४५ अहवाल निगेटिव्ह

नांदेड जिल्ह्यात आज ४४ पॉझिटिव्ह तर ८४५ अहवाल निगेटिव्ह

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार शनिवारी ९०५ पैकी ४४ व्यक्तींचे अहवाल बाधित आले असून ८४५ अहवाल निगेटिव्ह आले.तर या अहवालानूसार एकाचा मृत्यू,३५ जणांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाच्या अहवालानूसार आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३५ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ९ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३५ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या ९०५ अहवालापैकी ८४५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २१ हजार ८१६ एवढी झाली असून यातील २० हजार ६७३ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३६४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार ९ जानेवारी रोजी अधार्पूर तालुक्यातील आंबेगाव येथील ६० वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत कोविडमुळे जिल्ह्यातील ५७८ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २५, खाजगी रुग्णालय ५, माहूर तालुक्यांतर्गत १, देगलूर कोविड रुग्णालय ३ असे एकूण ३५ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.७६ टक्के आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २३, मुखेड तालुक्यात १, लोहा २, कंधार २, परभणी १, नांदेड ग्रामीण १, अधार्पूर ३, हदगाव १, अदिलाबाद १ असे एकुण ३५ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, मुखेड तालुक्यात १, लोहा २, नांदेड ग्रामीण १, बिलोली १, भोकर १ असे एकुण ९ बाधित आढळले. जिल्ह्यात ३६४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

राजठाकरेंच मनसैनिकांवरचे प्रेम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या