22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडकोरोना संकटाच्या नावाखाली शासनाने शेतक-यांना सोडले वा-यावर

कोरोना संकटाच्या नावाखाली शासनाने शेतक-यांना सोडले वा-यावर

एकमत ऑनलाईन

देगलूर : गेल्या बारा महिन्यापासून कोरोनाचे राज्यावर घोंगावत असलेले संकटात अद्यापही कायम आहे मात्र अशाही स्थितीत जीवाची पर्वा न करता बळीराजा आपले कर्तव्य पार पाडीत आहे परंतु निसर्गाच्या काळ या शाळेत ती की सापडत असल्याने शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहे. त्याला आधार म्हणून शासनाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे होते मात्र आघाडी सरकारच्या काळात कोणतीच मदत न मिळाल्याने कोरोना संकटाच्या नावाखाली शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्रात सन २०१९ मध्ये शिवसेना ,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाआघाडी सरकार स्थापन झाले सरकार स्थापन होण्याच्या तीन वर्षा आधीपासून शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत जीवन जगत आहे. त्यामुळे स्थापित झालेल्या आघाडी सरकारच्या काळात उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळणे दुष्काळाच्या कचाट्यात मुळे शेतक-्यांना मदत करणे पिक विमा मंजूर करणे पिकांचे नुकसान झालेल्या सर्व शेतक-्यांना आर्थिक मदत देणे रासायनिक खते व बियाणे च्या किमती कमी करणे, सरसकट कर्जमाफी करणे यासह अनेक शेतकरी हिताचे अनेक निर्णय शासनाने अंमलबजावणी करणे शेतक-यांना अपेक्षित होते.

मात्र केवळ थकीत कर्जदारांना २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन लाख रुपयांची कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणार करणा-या शेतक-ाांचे हात मात्र कोरडे ठेवले याशिवाय.५०००० नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देणार या घोषणेचा थंडावा अजूनही शेतक-ाा पासून कोसो दूर आहे. ज्या तालुक्यांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे त्यांना दुष्काळी मदत देऊन तसेच पीक विमा मंजूर करणे गरजेचे होते मात्र पिक विमा कंपनीला मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मालामाल करून खरीप व रब्बी हंगामाच्या पीक विम्यापासून वंचित ठेवले. अतिवृष्टी बोंड आळी पिकावर पडणारी नवनवीन रोगराई अवेळी पडणारा पाऊस यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी पार खचून गेला आहे त्यामुळे नव्याने स्थापित झालेल्या महागडी सरकारच्या काळात शेतक-्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याची मीठ सोडले जात आहे.

राज्यात मार्च दोन हजार वीस पासून कोणते संकट घोंगावत आहे त्यामुळे लोक डाऊन च्या काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय बंद होते. मात्र अशा संकटात अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकरी व शेतमजूर कोणाला न जुमानता राबराब राबत होता मात्र संकटाचा या काळात शासनाला शेतकर्‍यांचा पडलेला विसर शेतक-यांचे मनोगत खचितच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या पाच वषार्पासून कपाशीवर बोंड आळी येत आहे तिच्या प्रकोप आत कापसाचे पीक फस्त होत आहे मात्र खासगी क्षेत्रात केवळ यंत्रयुग आणून बोंड आळी त्यांनी तुम्हाला कडे दुर्लक्ष का होत आहे त्याचे उत्तर मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे

सिटी स्कॅनचा स्कोअर २५ तरीही आजोबांची कोरोनाना हरवले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या