34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडकोरोनाच्या संकट काळात शेतीच पेटवतेय सर्व सामान्यांची चूल..!

कोरोनाच्या संकट काळात शेतीच पेटवतेय सर्व सामान्यांची चूल..!

एकमत ऑनलाईन

अधार्पूर (रामराव भालेराव ) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये शहरातील औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद पडल्यामुळे लाखो कामगार बेरोजगार झाले. मात्र ग्रामीण भागातील शेतक-्यांच्या शेतातील कामे उपलब्ध झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना शेतात काम मिळाल्याने उदरनिवार्हाचा प्रश्न मिटला आहे. अशा परिस्थितीत अखेर शेतीनेच कामगारांना आधार देऊन सर्व सामान्यांची चुल पेटवली आहे.

राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असताना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील अनेक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात शेतक-्यांनी स्वत:ला आपल्या शेतातच पून्हा एकदा क्वारंटाईन केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. अनेक शेतक-्यांनी आपला मुक्काम शेतात हलवला असून या निमित्ताने शेतकरी शेतातील कामंही उरकून घेत आहेत. त्यातच कोरोना महामारीच्या लॉकडाऊन मूळे शहरातील खासगी कंपनीत काम करणा-्या लाखो कामगारांच्या नोक-्या गेल्या. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी शेतक-्यांच्या शेतातील कामे उपलब्ध असल्यामुळे या बेरोजगार झालेल्या कामगारांना शेतात काम करून चार पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न मिटला असून शहरातील कारखाने बंद असताना शेतातील कारखान्यानी अनेकांना आधार दिला आहे.

सध्या स्थितीला कोरोना संसर्गाच्या भितीमूळे शहरातील कारखान्यासह बाजारपेठा बंद असली तरी ग्रामीण भागातील शेतकरी मात्र मजूरांच्या हाताला काम देत आहेत. जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी आजही अनेक कुटुंबाची भूक भागवित असून लाखो बेरोजगार युवकाच्या हाताला काम देऊन त्यांच्या चूली पेटवण्याचे काम करित आहेत. असे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या अनेक जणांना रोजगार मिळत नाही. मात्र, ग्रामीण भागातील मजूरांना शेतात रोजगार मिळत आहे. त्यामुळे शहरातून आलेले मजूर, वाहन चालक, मिस्त्री, दुकानावर काम करणारे कारागीर ही सर्व मंडळी शेतामध्ये राबताना दिसत आहेत. ज्यांना कोणतेही उदरनिवार्हाचे साधन नाही त्यांना शेतीमूळे शेतकर्‍यांकडून रोजगार उपलब्ध होत आहे.

आज घडीला शेतात खरीप हंगामातील पूर्वमशागत, हळद काढणी, शिजवणी, वाळवणे यासह शेतातील अनेक कामे वेगाने सुरू आहेत. तसेच गहू, भुईमूग व उन्हाळी ज्वारी काढणीचे कामंही सुरू होत आहेत. अत्यंत खुल्या आणि निरोगी वातावरणात शेतकरी येणा-्या हंगामाची तयारी करीत आहे. त्यामुळे मजुरांनाही रोजगार मिळतो आहे. खरे तर शहरातील कारखाने बंद पडली तरीही शेवटी शेती आणि शेतकरी राजा सर्व सामान्य कामगार आणि मजुरांची चूल पेटवित आहेत असेच बोलल्या जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या