भोकर : प्रतिनिधी
येथील संदीप गौड मित्र मंडळाच्या वतीने २१ ते २६ जानेवारी दरम्यान आमदार चषक क्रिकेट स्पधेर्चे आयोजन करण्यात आले असून संदीप भाऊ मित्र मंडळाच्या वतीने काल दिनांक २१ जानेवारी रोजी भोकर येथे आमदार चषक क्रिकेट स्पधेर्चे उद्घाटन झाले. २६ जानेवारी रोजी सेमी अंतिम सामना असून बक्षीस वितरण कार्यक्रम माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांच्यासह भोकर येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर भोकर पंचायत समितीचे माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रावनगाकर भोकर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष युसूफ भाई, डॉक्टर बिल्लरवार, निळकंठ वषेर्वार, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
प्रथम येणा-या संघास ७० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात असुन पारितोषिक वितरण कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. २१ जानेवारीपासून सुरु होणा-या टेनिस बॉल क्रिकेट आमंत्रित संघाचे सामने जि. प. हायस्कूलच्या पाठीमागे किनवट रोड भोकर येथे होणार असून प्रथम पारितोषिक ७० हजार रुपये शेख युसूफ यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये स्वर्गीय श्रीनिवास अंदबोरीकर यांच्या स्मरणार्थ नरसिंह पेट्रोलियम भोकरतर्फे, तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपये दिलीप गरप्पा सोनवडे यांच्यातर्फे चौथे बक्षीस २१ हजार रुपये जितेंद्र देशमुख भोसीकर यांच्यातर्फे व तसेच मॅन ऑफ द सिरीज तौसीफ ईनामदार यांच्याकडून ७७८६ रुपये, बेस्ट फिल्डर पंकज पोकलवार यांच्याकडून ५ हजार ५५६ रुपये, बेस्ट कीपर आनंदराव चिठ्ठे यांच्या कडून कै.जळबाजी चिठ्ठे यांच्या स्मरणार्थ ५ हजार १ रुपये तर बेस्ट बॅट्समन गौतम कसबे ५००० रुपये, बेस्ट बॉलर यासाठी कै.लिंगारेड्डी अनमोलवार यांच्या स्मरणार्थ राजेद्र अनमोलवार यांच्याकडून ५ हजार रुपये अशी इतर बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.