29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडधमार्बाद तालुक्यात कोरोना रूग्णांत वाढ

धमार्बाद तालुक्यात कोरोना रूग्णांत वाढ

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : येथील कोवीड केअर सेंटर मध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसिलदार दत्तात्रय शिंदे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ.वेणूगोपाल पंडीत, डॉ.कांबळे, डॉ.शिवप्रेमा विभुते व इतर वैद्यकीय अधिकारी व पारीचारीका तसेच आरोग्य कर्मचा-्यांनी आपले जीव धोक्यात घालून रूग्णांची सेवा करीत आहेत.

येथील कोवीड केअर सेंटर मध्ये आता १२० च्यावर कोरोना रुग्णांची संख्या झाली असून सदरील रूग्णांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी,पारीचारीका व आरोग्य कर्मचा-ाांनी योग्य औषधोपचार करीत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे मनोबल वाढत असल्याचे अनेक कोरोना रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

तसेच कोवीड केअर सेंटर मध्ये रूग्णांना सोयी सुविधा भरपूर मिळत आहेत.तसेच वरचेवर नगरपरीषदेचे कार्यालयीन अधीक्षक बाबूराव केंद्रे व स्वच्छता विभाग प्रमुख अशोक घाटे यांनी कोवीड केअर सेंटरची साफ सफाई करण्यासाठी सफाई कामगार व कर्मचा-यांची नियुक्ती केल्यामुळे होत असलेले साफ सफाई व रूग्णांना योग्य औषधोपचार व मार्गदर्शन वेळेवर मिळत असल्यामुळे आजपर्यंत शेकडो कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले.व त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.विशेष असेकी येथील कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेला कोरोना रुग्णांचे निधन झाले नाही.परंतु प्रकृती गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांवर येथील कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार देण्यासाठीच सुविधा नसल्यामुळे त्यांना नांदेड किंवा निजामाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवित आहेत.परंतु पाठविलेल्या अनेक रुग्णांचे मुत्यु झाले आहे.

त्यामुळे कोरोना आजाराचे लक्षणे दिसताच नागरीकांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल व वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिका-यांनी केले आहे.येथील कोवीड केअर सेंटर मध्ये कोरोना रुग्णांना मिळत असलेल्या सोयी सुविधा व औषधोपचार व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिका-ाांचे मार्गदर्शन नांदेड जिल्ह्यातील इतर कोणत्याही कोवीड केअर सेंटर मध्ये मिळत नसल्याचे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतलेल्या नागरीकांनी सांगितले आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व कोरोना रुग्णांना तसेच तालुक्यातील गोर गरीब जनतेला शासनाची मदत पोचण्यापूर्वीच येथील सुप्रसिध्द उधोजक सुबोध काकाणी यांनी आपल्या परीवाराकडून दररोज येथील कोवीड केअर सेंटर मधील कोरोना रुग्णांना व तेथील कर्मचा-यांना सकाळी नाश्ता, दुपारी व संध्याकाळी मोफत व उत्तम जेवणाची व्यवस्था कोवीड केअर सेंटर सुरु झाल्यापासून केल्यामुळे कोरोना रुग्णांचे व त्यांच्या परीवारातील सदस्यांचे मनोबल वाढले आहे.

तसेच कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांचे ताण कमी झाले आहे.तसेच उधोजक सुबोध काकाणी यांनी गेल्या वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे धमार्बाद शहराचे नाव महाराष्ट्रात व इतर राज्यात लौकीक झाले आहे.धमार्बादच्या इतिहासात आजपर्यंत माज्या बघण्यामध्ये जनतेला विविध सोयी सुविधा मिळून देण्यासाठी सामाजिक कार्य व कोरोना रुग्णांची सेवा करणारा एकमेव उधोजक सुबोध काकाणी यांचे व त्यांच्या परीवाराचे तसेच मित्रपरिवाराचे नाव इतिहासात नोंद होणारे कार्य सध्या सुरू असलल्याचे चित्र दिसत आहे. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड व इतर पोलिस अधिकारी व कर्मचा-्यांनी परीश्रम घेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात वर्षानंतरही कोरोनाचे थैमान कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या