30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडहदगाव तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ

हदगाव तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ

एकमत ऑनलाईन

हदगाव : हदगाव तालुक्यात रुग्ण संख्येत दररोज वाढ आहे. तरिही नागरिक बेफिकीने वागुन नियमांची पायमल्ली करित आहेत़यामुळे कोरोना संसर्गाचा धोका जास्त वाढला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन विटनकर यांनी १२जुलैच्या मध्यरात्री पासून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २०जुलैच्या मधरात्री पर्यत जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला होता.

त्यानंतर ३ दिवसाची लॉकडाऊन मध्ये वाढ करण्यात आली होती.संचारबंदीचे नियम गुरुवारी मध्यरात्री समाप्त होताच शुक्रवारी पहिल्याच दिवशी हदगाव व तामसा येथे सोशल डीस्टन्सिंग नियमाचे पालन न करत नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले शनिवारी नागपंचमी रविवारी संचारबंदी होती़ सोमवारी व मंगळवारी बाजारपेठ चालू होताच नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे ठिकठिकाणी दिसून आले तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे़ आतापर्यंत तालुक्यातील ऐकून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे.

त्यापैकी ४ जणांनी या आजारावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी पाठीवण्यात आले आहे.उर्वरीत ११ रुग्णांवर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार चालू आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा येथे या चार दिवसात आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तामसा येथे एका खाजगी बँकमध्ये कर्मचाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तामसा येथील ग्रामपंचायत खडबडून जागे झाली आहे आज बँकेतील कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठीवण्यात आले आहे तालुक्यात दरोज रूग्ण सापडत असताना सुद्धा लॉकडाउन शिथिल केल्यानंतर आठवड्यातील दोनच दिवसात नागरिक बाजारपेठत विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करीत आहेत .आता कोरोना स्वत:च्या दारात येऊन पोहोचला असला तरी लोक मात्र बाजारात बेफिकीरपणे फिरत असल्याने लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याची गरज आहे.

Read More  महानगर पालीकेच्या वतीने रॅपीड टेस्ट सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या