23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home नांदेड कंधारमध्ये रुग्ण संख्येत वाढ; नागरिक रस्त्यावर

कंधारमध्ये रुग्ण संख्येत वाढ; नागरिक रस्त्यावर

कंधार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करत असताना मार्च महिन्यापासून जून आखेर पर्यंत कोरोनाची लवलेशही नसलेल्या कंधार तालुक्यात जून महिन्याच्या शेवटी कोरोनाने दस्तक दिली.

लोहा तालुक्यातील एका डॉक्टरच्या संपकार्ने सोनमाळ तांडा येथील एका महिलेचा रूपाने तालुक्यात पाय ठेवला पुढे कोरोनाग्रस्तांचा हा आलेख वाढत गेल्याने आजमीतीला कंधार तालुक्यात एकूण किती रुग्ण आहेत याबाबत तहसील प्रशासन व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून निश्चित किती रुग्ण संख्या आहे याबाबत वेगवेगळे आकडेवारी सांगत असल्याने एकूण किती रुग्ण कोरोना बाधित झाले आणि किती रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत याबाबत साशंकता आहे तसेच आज कंधार शहरातील कोवीड केअर सेंटर मधून चार जण कोरोना मुक्त तर ४ नवे रुग्ण आढळले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक अरविंद फीसके यांनी सांगितले

जून महिन्यात इंट्री केलेल्या कोरोनाने काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आणि फुलवळ नंतर कंधार तालुक्यात टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातील व शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढला तर सर्वसामान्यांनाही जीवाची घालमेल सुरू झाली प्रशासनाच्यावतीने कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनिंग आदी पध्दतीचा अवलंब करून तपासण्या होत आहेत.

Read More  पालकमंत्री महाआघाडीचे की राष्ट्रवादीचे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow