34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडफोडणीला महागाईचा तडका ; गृहिनीचे किचन बजेट कोलमडले

फोडणीला महागाईचा तडका ; गृहिनीचे किचन बजेट कोलमडले

एकमत ऑनलाईन

देगलूर : खाद्य तेलाच्या दरात दिवाळीपासून वाढ होत आहे सध्याचे दर तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणीचे स्वयंपाकाचे बजेटही कोलमडले आहे सर्वसामान्यांना आता वाढत चाललेल्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीची चा सामना करावा लागणार आहे. दिनांक १ डिसेंबर पासून गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे.

तिकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर ही वाढत आहे ते वाढत्या इंधन दरवाढीने सामान्यांचे जगणेच मुश्कील केले आहे वाहतूक खर्च वाढल्याचा फटका सर्वत्र बसला आहे त्यामुळे कमी अधिक प्रमाणात महागाईच्या झळा सहन करण्याची वेळ सर्वांवरच आली आहेत अशा स्थितीत कोरोणामुळे हातचा रोजगार गेल्याने मुंबई ,पुण्यासह इतर शहरातून अनेक कुटुंब गावाकडे परतली आहेत. यातून मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाला आहे. एक डिसेंबर पासून गॅस सिलेंडरच्या दरातही शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील महिलावर तर आपली चुलत बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागात चहासाठी सामान्य कुटुंब गॅसचा वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र खाद्य त्याला पर्याय नाही. स्वयंपाकयासाठी खाद्यतेल अशक्यच आहे .दसरा व दिवाळीमध्ये खाद्य तेलाचा वापर अधिक होत असल्याने त्याचे काही प्रमाणात भाव वाढणे सहाजिक होते. पण अपेक्षा पेक्षा अधिकच भाव वाढल्याने व्यापारी तर चकित झाले आहेतच. पण याचा सर्वात त्रास सहन जास्त हा सर्वसामान्य कुटुंबांना होत आहे .अवकाळी पावसामुळे सोयाबीन भुईमूग गहू तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर भाव वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे .अवकाळी पावसाने खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला सोयाबीन ,भुईमूग ही पिके हातची गेली आहेत. सोयाबीनला फटका बसल्याने त्याचा परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे. विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे ही दरवाढ कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे.

दसरा आणि दिवाळी पूर्वी सोयाबीनचे एक लिटर तेल ९५ रुपयांना मिळत होते ते दिवाळीला ९८ रुपये झाली या दिवाळीनंतर दर कमी होईल अशी अपेक्षा व्यापा-यांसह ग्राहकांना होती मात्र दर दर कमी झाले नाहीत उलट आहे त्या दरात मोठी वाढ झाली सध्या हे तेल १३५ ते १४० रुपयांना मिळत आहे. यातून सर्वसामान्य मात्र बेजार झाले आहेत.

महिला समोर काटकसर हाच पर्याय
दिवाळीत खाद्य तेलाचे भाव वाढले ते भाव आजही वाढतच आहेत. त्यात गॅस सिलिंडरची भाववाढ होत आहे परिणामी सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. अशा स्थितीत काटकसरी शिवाय महिला समोर पर्याय उरला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाली आहे. यातून विविध खाद्य तेलाचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तूंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल उपहारगृहातील विविध खाद्य पदार्थ बनविण्यासाठी तेल वापरत होते. त्यामुळे या सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयात केले तरच खाद्यतेलाच्या भाववाढीला आळा बसू शकतो अन्यथा आगामी काही दिवसात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

असे आहेत प्रत्येक किलो तेलाचे दर
सूर्यफूल एक लिटर दिवाळीआधी ११० रुपये, दिवाळीत ११० ते ११५ रुपये होते .सध्या १४० ते १५० रुपये आहे. पाम तेल एक लिटर दिवाळीपूर्वी ८५ रुपये तर दिवाळीत ९० ते ९५ रुपये होते सध्या १३० ते १३५ रुपये आहे. शेंगदाणा एक किलो दिवाळीपूर्वी शंभर रुपये होते तर दिवाळीत १०० ते ११० रुपये झाले. सध्या १७० ते १८० रुपयाच्या घरात गेले आहे. सर्व प्रकारच्या खाद्य तेलांच्या किमती कमी अधिक झाल्या आहेत. सर्रास ग्राहकांची पामतेल आणि सोयाबीन तेलाची मागणी अधिक असते. सर्रास ग्राहकांची पाम तेल आणि सोयाबीन तेलाची मागणी अधिक असते परंतु दिवाळीपासून दररोज भाव वाढ होत असल्याने त्याचा परिणाम उलाढालीवर दिसून येत आहे. आज पर्यंत एवढी भाववाढ कधीच झाली नव्हती असे किराणा दुकानदार सांगत आहेत.

डीआरडीओकडून खासगी उत्पादकांशी करार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या