29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडकाही ठिकाणी चौकशी, काही जागी अलबेल

काही ठिकाणी चौकशी, काही जागी अलबेल

एकमत ऑनलाईन

नांदेड: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानूसार ब्रेक द चैन अंतर्गत कडक लॉकडाऊनची गुरूवारी रात्री आठपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.परंतू पहिल्याच दिवशी शुक्रवारी शहरातील काही भागात दुपारी बारापर्यंत झालेल्या गर्दी आणि रस्त्यावरील वदर्ळीमुळे सर्व काही अलबेल दिसून आले तर काही भागात फक्त वाहनधारकांची चौकशी करून सोडण्यात येत होते.यामुळे लॉकडाऊन आहे की सर्व काही सुरू आहे,अशी प्रतिक्रया उमटत होती.

राज्यभरात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा उदे्रक सुरू आहे.यात नांदेड जिल्ह्यात ही कोरोनाचे रूग्ण झपाटयाने वाढत आहेत.ऑक्सीजन, बेड आणि गंभीर रूग्णांना उपचार मिळणे अवघड होत आहे.जिल्हयात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडुन १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासुन ते ३० संचारबंदी लागु करण्यात आली होती. काही निर्बंधासह अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांना यात सुट देत, ती विहीत वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मागच्या काही दिवसापासुन राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येतील वाढ असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासुन ते १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत कडक निर्बंध लागु करण्याच्या सुचना संबंधीत विभागाला दिल्या आहेत.

त्या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहेग़ुरूवारी दुपारपासूनच शहरातील मुख्य चौकात बॅरीकेट्स लावण्यात आले.प्रमुख चौक व रस्त्याची एक बाजू वाहतुकीस बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ नंतर शहरात ही शहराच्या काही भागात दुपारी बारावाजेपर्यंत नागरिकांची गर्दी दिसून आली.तर काही भागात विनाकारण बाहेर फिरणारांची पोलिस प्रशासनाकडुन कडक चौकशी करण्यात येत आहे. कारण नसताना घराबाहेर फिरना-यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश असल्याने ११ वाजेनंतर रस्त्यावर कमीच वर्दळ दिसुन येत आहे.

मात्र तरीहि सकाळी ८ च्या दरम्यान किराणा दुकाण, भाजीपाला दुकान, दुध , मेडीकल खरेदीच्या बहान्याने याठिकाणी नागरीक मोठी गर्दी करताना दिसुन येत आहेत. सकाळच्या तीन ते चार तासात अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक गर्दी करित आहेत.रस्त्यावरही वाहतुकीची वर्दळ दिसून येत आहे.यामुळे बे्रक द चैन ची अंमलबजाणी आहे की सर्व काही अलबेल आहे,अशी पतिक्रिया उमटत आहे.दरम्यान नागरीकांनी अत्यावश्यक असल्याच घराबाहेर पडावे असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात येत आहे.

कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारसह अनेक प्रभागात वर्दळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या