तामसा : प्रतिनिधी
पिंपळगाव (ता. हदगाव) येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिराकडे जाणा-या प्रशासकीय रस्त्यांची पाहणी तहसीलदार जीवराज डापकर यांनी केली. प्रशासन व दत्त संस्थान यांच्या सहकायार्तून मंदिराकडे जाणा-्या दोन रस्त्यांचा विकास केला जात आहे. यामुळे मंदिराकडे गावातून जाताना भाविक व ग्रामस्थांना वाहतुकीच्या होणा-्या त्रासातून कायमची सुटका होणार आहे.
मंदिराकडे जाण्यासाठी गावा बाहेरून रस्ता असावा, ही भाविक व ग्रामस्थांची मागणी अखेर प्रशासनाच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकायार्ने मार्गी लागत आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रशासनाला या दोन्ही रस्त्यासाठी आग्रही सूचना केल्या आहेत. येथे दर्शन व विविध धार्मिक व आध्यात्मिक प्रसंगाने येणा-्या भाविकांची संख्या मोठी आहे. रस्त्याची अडचण दत्त संस्थानचे महंत व्यंकटस्वामी महाराज यांनी आमदार जवळगावकर व प्रशासनाकडे अनेकदा बोलून दाखविली होती.
मंदिराकडे जाणारी दोन्ही रस्ते खुद्द प्रशासनाच्या मार्गदर्शन व माध्यमातून उभारले जात आहेत. दोन्ही रस्त्यांच्या निर्मितीचे काम जोरात असून तहसीलदार डापकर व इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी रस्ते कामाला भेट देऊन सतत पाहणी करत आहेत. यावेळी विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर, तामसा सेवा सोसायटीचे संचालक नामदेवराव बाऊलकर, नारायण स्वामी महाराज, पुरवठा कर्मचारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.