22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेड‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या अनोख्या उपक्रमांतर्गत शेतक-यांशी संवाद

‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या अनोख्या उपक्रमांतर्गत शेतक-यांशी संवाद

एकमत ऑनलाईन

कंधार : तालुक्यातील मंडळ कृषि अधिकारी पेठवडज अंतर्गत मौजे रुई या गावात ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक आत्मा, नांदेड यांनी शेतक-­यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

माधुरी सोनवणे यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शेतक-­यांना येणा-­या अडचणी समजून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने गावातील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित ग्राम कृषि संजीवनी समिती व गावक-यांसोबत बैठक घेऊन कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच आपत्कालीन पीक नियोजन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, स्मार्ट योजना, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, सामूहिक शेततळे, शेडनेट, यांत्रिकीकरण, अवजारे बँक, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे, शेतकरी महिला बचत गटांना छोटे छोटे उद्योग उभारून स्वावलंबी बनवणे, इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तसेच मार्गदर्शनानंतर गावातील शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या उत्पादनवाढीमध्ये व शेती करताना येणा-या अडचणी, वेगवेगळ्या विभागाकडून येणा-या अडचणी, इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करून शेवटी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतक-यांच्या फळबाग लागवड योजनेची पाहणी केली तसेच बेडवर ठिबक सिंचनवर सोयाबीन लागवडीचा प्रकल्प याचीसुद्धा पाहणी करून शेतक-यांना मार्गदर्शन केले तसेच रुई गावातील मिरची बीज उत्पादन कार्यक्रमाच्या शेडनेटलासुद्धा भेट देऊन तेथील अडचणी व उत्पादनात येणारी तफावत याबाबत चर्चा करून शेतक-यांना मार्गदर्शन केले

वरील कार्यक्रमाचे नियोजन मंडळ कृषि अधिकारी पेठवडज विकास नारनाळीकर यांनी केले असून मंडळ कृषि अधिकारी पेठवडज अधिनस्थ गावातील पीक परिस्थिती व इतर माहिती प्रास्ताविकामध्ये मांडून कार्यक्रमाला सुरुवात केली, तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी पोखरा योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करून सर्व घटकांचा लाभ घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास आत्माचे बीटीएम विनोद कुलकुंडवार, कृषि सहाय्यक सय्यद सरताज, समूह सहायक देवकांबळे, सरपंच पवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या