23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडकारवाडीच्या शिक्षकाला मन की बात कार्यक्रमाचे निमंत्रण

कारवाडीच्या शिक्षकाला मन की बात कार्यक्रमाचे निमंत्रण

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे गेली दीड ते दोन वषार्पासून शाळा बंद होत्या. मात्र अद्ययावत तंत्रज्ञान, शिक्षकांची धडपड व विद्यार्थ्यांची आवड यातून उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांनी मुलांशी गप्पा या सदरातून विद्यार्थ्यांशी गप्पा मारत ज्ञानाचे धडे दिले. या उपक्रमाची खुद्द पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात संवाद साधण्याची संधी कारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला मिळाली आहे.

तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक संतोष मारोतराव राऊत हे लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून मागील ३७८ दिवसांपासून विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत. यामध्ये राज्यभरातील १० जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी जोडले गेले आहेत.

लॉकडाऊन काळातील परिस्थिती लक्षात घेऊन आदर्श शिक्षक संतोष राऊत यांनी ऑनलाइन शिक्षणाचे आव्हान स्वीकारून जुलै २०२० पासून दररोज सकाळी झूम व गुगल मीटिंगच्या मदतीने अर्धा तास योग सराव, आठ ते नऊ या वेळेत शैक्षणिक अभ्यासाच्या तासिका, सायंकाळी एक तास माहिती तंत्रज्ञान तासिका असा शैक्षणिक अभ्यास नियमित घेतात. अभ्यासा बरोबरच या समूहातील विद्यार्थी उत्तम तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आज मितीला या समूहातील अनेक विद्यार्थी स्वत: झूम, गुगल मिट ची मीटिंग घेत आहेत. एवढेच नव्हे तर इतरही अनेक अ‍ॅपची माहिती इतरांना मीटिंगमध्ये समजावून सांगत आहेत.

आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून २०० च्या वर टेस्ट झाल्या असून तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या आहेत. तसेच नाशिक येथील शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शक तासिकेतून दोन विद्यार्थ्यांनी स्वत:चे अ‍ॅप्स बनवले आहेत. तर या उपक्रमातून अभ्यासा बरोबरच विविध अ‍ॅप्सचे निमार्ते, कवी, लेखक, गायक, सैनिक, वैमानिक, मंत्रालय कक्ष अधिकारी, चित्रपट कलाकार, लघुपट निमार्ते, शिल्पकार, चित्रकार, पत्रकार शेतकरी, भजनी, मातीचे किल्ले निर्मिती करणारे अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करून पुस्तकाबाहेरचा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय विना दप्तराची शाळा, बांधावरील शाळा आदी २८ उपक्रम मुलांशी गप्पा या माध्यमातून राबविण्यात आले आहेत.

शिक्षक राऊत पंतप्रधानांशी साधणार संवाद
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात अधार्पूर येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत हे दि. २५ जुलै रोजी रविवारी देशातील निवडक व्यक्तींसोबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद कारवाडीचे शिक्षक संतोष राऊत यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते. असा मेसेज माय गव्हर्मेट यांच्याकडून शिक्षक संतोष राऊत यांना दि .१७ जुलै रोजी प्राप्त झाला आहे. त्यावरून त्यांनी केलेल्या उपक्रमा विषयीची सविस्तर माहिती माय गव्हर्मेट कडे पाठवली आहे. अशी माहिती शिक्षक संतोष राऊत यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली आहे.

भारत बायोटेकचा ब्राझीलसोबतचा करार संपुष्टात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या