30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home नांदेड ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आयर्न मॅन कृष्णप्रकाश यांची नोंद

‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आयर्न मॅन कृष्णप्रकाश यांची नोंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : महाराष्ट्र पोलीस दलातील एक डॅशिंग, कणखर पण तितकाच संवेदनशील, कायद्यासोबत अध्यात्मिक व संत साहित्यावर प्रचंड पगडा असणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अत्यंत गौरवास्पद असा आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन’मध्ये करण्यात आला आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरी मधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्णप्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. या गौरवास्पद कामगिरी करिता ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’चे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते कृष्णप्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त कृष्णप्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल स्वागत केले.

पोलीस दल हे त्यांच्यावर असलेल्या अतिरिक्त कामकाजामुळे व तणावामुळे, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता उरफ मधून प्रचंड निधी उभा करत आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणेचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फिटनेस बँड घड्याळ व सायकलीचे वाटप केले होते.

जय हो यंगिस्तान !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या