24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडलोहा पोलिसांनी पकडली महिला चोरट्यांची टोळी !

लोहा पोलिसांनी पकडली महिला चोरट्यांची टोळी !

एकमत ऑनलाईन

लोहा : शहरातील शिवाजी चौकात फिरणा-या दहा महिला चोरांना लोहा पोलिसांनी पकडले आहे. या बाबतीत लोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या दरम्यान खाजगी बसमध्ये नांदेडला जाणा-या महिलेच्या पर्स मधील दोन हजार रुपये चोरतांना तिच्या लक्षात आले व त्या प्रवासी महिलेने आरडाओरडा करताच चौकातील तरुण गजू कांबळे आणि ईतर युवकांनी पाठलाग करून पकडले आणि घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक संतोष तांबे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना ठाण्यात दाखल करून पुढील कार्यवाही सुरु होती.

पडदे, मोबाईल साहित्य, पर्स विकण्याच्या नावाखाली या चोरी करण्याच्या ईराद्याने महिला फिरत आहे तेव्हा लोहा पोलीस ठाणे अंतर्गत सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या