29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडआयटी इंजिनिअरचा पत्नीवर अत्याचार

आयटी इंजिनिअरचा पत्नीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
पत्नीसोबत अनैसर्गिक संबध करणा-या एका आयटी इंजिनिअरला न्यायालयाने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ जानेवारी २०२२ रोजी एका २७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न २१ फेबु्रवारी २०२१ रोजी झाले आहे. तिचा नवरा आयटी इंजिनिअर आहे आणि कोरोनामुळे वर्कफॉर्म होम या संकल्पनेत तो घरी राहुनच काम करीत आहे.

लग्नानंतर माझ्याकडे असलेल्या फोनवर माझ्या नातलगांचे आलेले फोन त्यांना आवडत नसे, म्हणून त्यांनी माझा फोन स्वत:कडे ठेवला. जिवे मारण्याची धमकी देवून माझा इंस्टाग्राम आयडी व पासवर्ड घेवून टाकला. माझ्या लग्नानंतर माझा नवरा आणि सासु हे फक्त १५ दिवस माझ्यासोबत चांगले वागले.त्यानंतर २५ जून २०२१ रोजी रात्री मला अश्लिल व्हिडीओ क्लिीप दाखवून माझ्सोबत अनैसर्गीक व्यवहार केला. याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. घडलेला प्रकार मी माझ्या सासुला सांगितला तर तेंव्हा त्यांनी तु बायको आहे सहन करावे लागते असे सांगून अत्याचार केला. वेळोवेळी होणा-या अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून मी १० जानेवारी २०२२ रोजी माझ्या माहेरी आले आणि तक्रार देत आहे, असे तक्रारीत नमुद केले आहे.

नांदेड ग्रामीण पोलीसांनी याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७, ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार विवाहितेचा नवरा आणि तिच्या सासुविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आयटी इंजिनिअर असलेल्या नव-याला सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांनी १३ जानेवारी मध्यरात्रीनंतर अटक करून, आयटी इंजिनिअरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या