नायगाव : बाराव्या शतकात महामानव महात्मा बसवेश्वरांनी स्री आणि पुरूष यांना समानतेचा अधिकार दिला.त्याच बरोबर ज्या समाजाला तुच्छ समजत होते त्यांना ईष्टलिंग ह्रदयावर बांधून समानतेचा आधिकार दिला.सर्व समाजातील लोकांना एकत्र बसण्यासाठी बोलण्यासाठी विचार मांडण्यासाठी शिवा महाअनुभव मंडप तयार केले.सर्व समाजातील लोकांना समतेचा आधिकार दिले . अशा क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची महिती नव्या पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे असे मोलाचे विचार शि.भ.प. निळकंठ विभूते गुरुजी लातुरकर यांनी धुप्पा येथे काढले.
दि.२२ फेब्रुवारी रोजी धुप्पा येथील हनुमान मंदिर मैदानात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा १०७ वा जन्म उत्सव सोहळा, किर्तन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किर्तनकेशरी तथा राष्ट्रीय किर्तनकार शि.भ.प. श्री निळकंठ विभूते गुरुजी लातुरकर हे भाविक भाविक्ताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या आरंभी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा १०७ वा जन्मदिन सोहळ्या निमित्त माहत्मा बसवेश्वर महाराजांच्या व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रतिमेची पूजन करुन दिपप्रज्वलन श्री ष.ब्र.१०८ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
धुप्पा येथील सौ.शांताबाई सुधाकर दरेगाये यांना ब-यांच वर्षांनंतर कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर मुलींच्या नामकरण सोहळ्यानिमित्त राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा जन्मउत्सव,किर्तन व प्रर्वचन आणि अन्नदान अशा त्रिवेणी संगम कार्यक्रम घडवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे स्त्री जन्माचे इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि सन्मानाने कुठेच स्वागत झाले नसेल. अशा कार्यक्रमांचे अनुकरण इतरांनी घेतले पाहिजे असे अनमोल विचार सद्गुरू सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी सांगितले. त्यानंतर सौ. शांताबाई सुधाकर दरेगाये याच्या मुलींचा नामकरण सोहळा शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश्वरी हे नाव ठेवुन संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुप्पा गावातील सर्वंच नागरिकांनी परीश्रम घेतले.