16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeनांदेडरेल्वे वसाहतीत वीजचोरी करणे पडले महागात

रेल्वे वसाहतीत वीजचोरी करणे पडले महागात

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर (परमेश्वर शिंदे) : शहरातील रेल्वे स्थांनकाच्या समोर मागील दोन वर्षापासून होत असलेल्या वीज चोरी संदर्भात २० ऑगस्ट रोजी दैनिक एकमतने एक बातमी प्रकाशित केली होती ज्यात अंदाजे २० लाख रुपयांपर्यंत सबंधित गुत्तेदारास दंड लागेल असे भाकीत केले होते? ते आज खरे ठरले आणि शहरातील रेल्वे वसाहतींच्या नवीन बांधकामांवर सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंग च्या कंत्रादारांवर १८ लाख ५१ हजार ५० रुपयाचा दंड आज ठोठवला असल्याचे बिल त्यांनी सबंधित कंत्राटदारांस दिले असल्याचे सहाय्यक अभियंता शहरी पवन भडंगे व तंत्रज्ञ विशाल जेजरवाड यांनी सांगितले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वीजचोरी करणे हे कायद्याने गुन्हा आहे. हे आज हिमायतनगर येथील महावितरणच्या कर्तव्य दक्ष अधिका-यांनी दाखवुन दिले आहे. शहरातील फुले नगर येथील गावठाण डि.पि.वरून आलेला लघुखांब वाहिनीच्या हेद्रे यांच्या घराजवळील पोल वरून डायरेक्ट आकडा टाकुन दिवसाला जवळ पास २६.५ कि.व्याट वीज चोरी होत असल्याची माहिती हिमायतनगर येथील पत्रकार यांनी महावितरणच्या अधिका-यांना सांगितल्या नंतर त्यांनी तात्काळ घटना स्थळी कर्मचारी पाठऊन थेट घटनेचा पंचनामा करून शहरातील रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर धडक कारवाई केली होती.

पण त्याचे सविस्तर बिल त्या दिवशी तयार झाले नसल्याने दैनिक एकमत ने एक भाकीत केले होते ते आज खरे ठरले. दोन दिवसाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर व व सर्व तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या घटने वर आज सबंधित महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट २००३, अंडर सेक्शन १३५, असेसमेंट बिल १० प्रमाणे २० ऑक्टोंबर रोजी केलेल्या पंचनाम्या नुसार इलेक्ट्रिसिटी बिल १७,५६,५५० व असेसमेंट बिल ९५ हजार असे मिळून १८,५१,५५० एवढा दंड दहीफळे व विवेक इंजीनियरिंग एजन्सीच्या सब कॉन्ट्रॅक्टर ला लावला असल्याचे सहाय्यक अभियंता (शहरी )पवन भडंगे व तंत्रज्ञ विशाल जेजरवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले व त्याची अधिकृत प्रत त्यांनी दिली.

हिमायतनगर शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सातव यांच्या उपस्थित केलेल्या पंचनाम्यानुसार रेल्वे वसाहतीच्या नवीन बांधकामावर होत असलेली वीज चोरी प्रकरण उघड करत, सबंधित दहिफळे आणि विवेक इंजिनिअरिंगच्या कॉन्ट्रॅक्टर वर एकूण १८ लाख ५१ हजार ५५० रुपयाचा दंड लावला असल्याचे सहाय्यक अभियंता शहरी पवन भडंगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या