34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडजामगा शिवणी प्रकरणी लोह्यात कडकडीत बंद

जामगा शिवणी प्रकरणी लोह्यात कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

लोहा : जामगा शिवणी येथील दलित युवक गणेश एडके यांच्यावर हल्ला करून इतरांना जखमी केल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान संघटनेने पुकारलेल्या कडकडीत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी दिली. दि.२३फेब्रुवारी रोजी सायंकाळी मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शिवनी येथील संदीप संभाजी दुधमल वय २६ हा सायकल वरून जात असताना याच गावातील बसवेश्वर बोमनाळे याच्या मोटर सायकल स्वाराला धडक दिली.दोघात बाचाबाची झाली पण तेथेच वाद मिटला होता.पण नंतर बसवेश्वरने गावात जावुन सांगितले.तदनंतर प्रल्हाद आप्पाराव जामगे,आप्पाराव जामगे,या सह आठ आरोपींनी संगनमत करून गणेश शेळके याच्या डोक्यात कुराडीचा घाव घातला व दुधमल यांच्या घराचा दरवाजा तोडून कुटुंबीयांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून अ‍ॅट्रॉसिटी सह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी लोहा शहरात तालुक्यातील विविध दलित संघटनांनी बौद्ध समाज मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्याने दलित चळवळीतील संघटनांचा मूक मोर्चा शहरातील प्रमुख मागार्ने निघून पोलीस ठाण्यावर धडकला.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जायभाये यांना निवेदन देण्यात आले आरोपींना कडक शासन करून गंभीर जखमींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

या निषेध रॅलीत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बबन निर्मले,बालाजी खिलारे, राहुल प्रधान,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती दादा धुतमल, नगरसेवक पंचशील कांबळे,नरेंद्र गायकवाड,अनिल गायकवाड,अशोक सोनकांबळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले सह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मुलांचा अभ्यास आणि पालकांची कसरत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या