18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडनांदेड मनपा महापौरपदी जयश्री पावडे

नांदेड मनपा महापौरपदी जयश्री पावडे

एकमत ऑनलाईन

नांदेड : महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी महापौर पदासाठी जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज कायम राहिला.यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.आता केवळ दि.१३ रोजी होणा-या मनपाच्या ऑनलाईन विशेष सभेत पावडे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. नांदेडच्या विद्यमान महापौर मोहिनी येवनकर यांनी पक्ष श्रेष्ठीच्या सुचनेनूसार दि.३०सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापौर पदाचा कालावधी अडीच वर्षाचा होता पण आता नवनियुक्त महापौरांचा कार्यकाळ उर्वरीत कालावधीसाठी आहे.

सध्याचे महापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. यामुळे प्रारंभीच्या सव्वा वर्षापासून म्हणजेच मोहिनी येवनकर यांच्या सोबतच जयश्री पावडे यांचे नाव महापौर पदाच्या दावेदार म्हणून चर्चेत आले होते.परंतू येवनकर यांनी प्रथम बाजी मारली.आता पक्ष श्रेष्ठीने ठरविल्या प्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाळ पुर्ण होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला.यामुळे नव्या महापौर निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून जाहीर झाला आहे.यानूसार महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ ही तर याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यासाठी वेळ देण्यात आली आहे.

महापौर पदासाठी कॉंग्रेसच्या जयश्री पावडे यांनी दोन नामनिर्देशन पत्र घेऊन नगर सचिव अजितपालसिंघ संधू यांच्याकडे दाखल केले. एका अर्जावर अनुमोदक म्हणून दयानंद वाघमारे तर सूचक म्हणुन अब्दुल शमीम आहेत. तर दुस-या अर्जावर संगीता पाटील या सूचक तर अमितसिंह तेहरा हे अनुमोदक आहेत. अर्ज दाखल करतांना माजी राजयमंत्री डी.पी.सावंत, माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर मसूद खान, माजी उपमहापौर सतीश देशमुख, शमीम अब्दुल, शाम दरक, अ‍ॅड. निलेश पावडे, माजी महापौर शैलजा स्वामी, संगीता पाटील डक आदींची उपस्थिती होती.

जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज कायम राहिला.यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.आता केवळ दि. १३ ऑक्टोबर रोजी महापौर निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष ऑनलाईन सभेत पावडे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन सभा सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.सभा सुरू होताच १५ मिनिटात लेखी निवेदनाद्वारे नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. यानंतर नव्या महापौर निवडीची घोषणा केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या