18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडनांदेडच्या महापौरपदी जयश्री पावडे विराजमान

नांदेडच्या महापौरपदी जयश्री पावडे विराजमान

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेडच्या चौदाव्या महापौर म्हणून काँग्रेसच्या जयश्री निलेश पावडे विराजमान झाल्या आहेत.महापौरपदासाठी एकमेव अर्ज आल्याने बुधवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. पदभार स्वीकारताच पावडे यांनी कामाला सुरूवात केली असून अधिका-यांनी नागरिकांची कामे वेळेत करावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा दिला आहे.

नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असून काँग्रेसने अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या कार्यकाळात दोन महापौर करण्याचा निर्णय घेतला होता. सव्वा वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे महापौर मोहिनी येवनकर यांनी दि.३० सप्टेंबर रोजी आपला राजीनामा दिला.यानंतर विभागीय आयुक्तांकडून नव्या महापौर निवडीचा कार्यक्रम घोषीत झाला होता.यानूसार दि. ९ ऑक्टोबर रोजी पुर्वीपासून स्पर्धेत असलेल्या जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.तेव्हाच त्यांची महापौरपदी निवड निश्चित झालीक़ेवळ निवडीची औपचारिक घोषणा बाकी राहिली होती.

निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या महापालिकाच्या विशेष सभेत पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी चौदाव्या महापोैर म्हणून जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.पदभार स्वीकारताच महापौर जयश्री पावडे यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आहे.यावेळी बोलतांना पावडे म्हणाल्या की,पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल याचे नियोजन करुन काम केले जाईल.

शहरातील पाणी पुरवठा व ड्रेनेजलाईनचे काम प्राधान्याने करून रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविण्याचे काम करण्यात येईल. यासह शहराचा आराखडा शासनाकडे पाठवण्यात येईल. मोकळ्या जागेवर क्रिडांगण उभारून विविध खेळांना चालना देऊ,असे सांगत शहरातील नागरिकांच्या समस्यांचे मनपा अधिकारी,कर्मचा-यांनी निरसण करावे.सर्वांची कामे वेळेत करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.असा इशारा महापौर जयश्री पावडे यांनी यावेळी दिला.

महापौरपदी निवड होताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपमहापौर मसूद खान, माजी महापौर मोहिनी येवनकर, शैलजा स्वामी, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, किशोर स्वामी, विजय येवनकर, विठठल पाटील, डॉ. दिनेश निखाते, माजी सभापती शिला निखाते , अब्दुल गफार अ.सत्तार यांनी जयश्री पावडे यांचे स्वागत केले.

राजकीय कारकिर्दीवर एक नजर
महापौर जयश्री निलेश पावडे या २००७ मध्ये वार्ड क्रमांक १३ येथून काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. २००७ ते २००८ मध्ये महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या. याच काळात त्यांनी महिलांसाठी विविध शिबिरे आयोजित केली व विविध योजना थेट महिलांपर्यंत पोहोचवणारे उपक्रमही राबविले. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष भर दिला. ऑक्टोबर २०११ मध्ये राजीनामा देऊन वाडी बु. जिल्हा परिषद गटातून २०१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. २०१७ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीवर प्रभावी काम केले. तर २०१७ मध्ये त्या प्रभाग क्रमांक ५ (ब) भाग्यनगर मधून निवडून आल्या व येथील नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या