हदगाव :- तामसा ते भोकर रोडवर घोगरी ता.हदगाव छोटेसे गाव आहे. येथील दिलीप जाधव यांची भाची कु.जयश्री पाच महिने तर कु.राजश्री दोन वर्षांची असताना या दोघी बहिणींची आईचे निधन झाले. दोन्ही मुलीला सोडून वडिलांनी दुसरा विवाह करून संसार थाटला.आई-वडील दोघांचेही छञ हरवल्यानंतर दोघीही दिलीप जाधव मामाकडे राहायला आल्या.मामाची परिस्थिती अतिशय गरिबीची व स्वत:चाच संसाराचा गाडा हाकत सर्व परीस्थितीचा सामना करीत दोन भाच्याची जबाबदारी पार पाडत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण तामसा भोकर येथे सुरू असुन कु.राजश्री हरणे अकरावी व कु.जयश्री हरणे बारावी सायन्सचे शिक्षण घेत आहेत.
भोकर येथून दररोज ये-जा करुन कसेबसे शिक्षण घेत असताना खडतर प्रवास घोगरी येथील सामाजिक कार्यकर्ते रामराव मोहीते यांनी बरडशेवाळा येथील साईप्रसाद स्वयंसेवकांशी सांगीतलेल्याने मदतीसाठी नांदेड येथील साईप्रसाद परीवाराला विनंती करण्यात आली. माणसाने माणसाशी सम प्रमाणात वागणे या विचाराने नांदेड सह देश विदेशातील तिने हजार च्या वर दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दोन वेळा जेवण व दिवसभर पिण्याचे शुद्ध पाण्याची सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याने सर्व परीचीत झाले आहे.हदगांव तालुक्यातील साईप्रसाद स्वयंसेवकांनी जयश्री व राजश्री च्या मामाशी संपर्क साधुन आवश्यक असणारी पुस्तके,नोटबुक,कंपास,स्कूल बॅग व प्रत्येकी चार ड्रेस असे एकूण रुपये दहा हजाराचे साहित्य साईप्रसाद परीवाराचे नांदेड येथील सदस्य श्री मनोजजी अग्रवाल यांनी घरपोच दिले.यामुळे मामा व जयश्री व राजश्री यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
जयश्री व राजश्री यांच्या खडतर प्रवासात साईप्रसाद परीवाराच्या मदतीला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाषराव जोगदंड यांनी दोन अनराईड मोबाईल दिले तर हदगाव तालुक्याचे भुमीपुत्र सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी मिराशे यांनी मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली.
राखी बांधण्याच्या अटीवर बलात्का-याला जामीन; प्रकरण सुप्रीम कोर्टात