23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडलोहयात शिवसेनेच्या वतीने बंडखोर नेत्यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

लोहयात शिवसेनेच्या वतीने बंडखोर नेत्यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

एकमत ऑनलाईन

लोहा : राज्यातील शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गदारी करून बंडखोरांचा गट करून गुवाहाटी येथे जवळपास ३९ आमदारांचा गट आसामच्या गुवाहाटी येथील रूडीसन फाईव स्टार मध्ये ठेवला असुन यात नांदेड उत्तर चे शिवसेना आ . बालाजी कल्याणकर यांनी ही गदारी केल्यामुळे आज दि.२९ जून २०२२ रोजी लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक मिंिलद पाटील पवार, जेष्ठ शिवसैनिक गणेश कुंटेवार, शिवसेना लोहा तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल, शिवसेना लोहा तालुका संघटक नागोराव पाटील उमरेकर, शिवसेना लोहा शहर प्रमुख गजानन कराडे (गुंठे), युवासेना विधानसभा संघटक बालाजी गाडेकर,

किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, युवा सेनेचे लोहा तालुका प्रमुख धनंजय पाटील बोरगावकर, शिवसेना उप तालुका प्रमुख संतोष एंडाळे,उमरा सर्कल प्रमुख हनमंत पाटील जाधव, सावरगाव सर्कल प्रमुख पांडूरंग पाटील गायकवाड, कलंबर सर्कल प्रमुख कैलास मोरे, साहेबराव हरगावकर, प्रल्हाद पौळ,अमर टेलर, शंकर पाटील सिरसाठ, बालाजी पाटील,नरेश महाबळे,, सरपंच भुंजग हिलाल, उपसरपंच बालाजी गुट्टे, यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी लोहा येथील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल बंडखोर एकनाथ शिंदे व आ. बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन काळे फासले व शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पांिठबा जाहिर केला .
यावेळी लोहा पोलीसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, विधानसभा संघटक मिंिलद पाटील पवार, जेष्ठ शिवसैनिक गणेश कुंटेवार, तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल शहर प्रमुख गजानन कराडे( गुंठे,) किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, आदीना अटक व सुटका केली.

यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे म्हणाले की, आम्ही सर्व जण शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गदार एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांनी वापस शिवसेनेत यावे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारावे शिवसेनेची गदारी करणा-यांना शिवसेना धडा शिकवेल अजून ही वेळ गेली नाही बंडखोरांनी वापस यावे आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे बाळासाहेब पाटील कराळे म्हणाले..

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या