36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडधर्माबाद ते मनूर रस्त्यावर खड्डाराज

धर्माबाद ते मनूर रस्त्यावर खड्डाराज

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : धमार्बाद ते मनूर रस्ता उखडल्याने या रस्त्यावर खड्डाराज निर्माण झाले आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. तरीही येथील रस्ता दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष कायम आहे. १० किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी वाहनधारकांना एक तासाचा वेळ लागत असून जीवघेणे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघातही होत आहे.

धमार्बाद तालुक्यातील मनूर हे गाव सीमावर्ती भाग असल्यामुळे या गावाकडे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. गावात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. धमार्बाद ते मनूर या मुख्य रस्त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर अपघातही होत आहेत. या रस्त्यावरून गावातील गंभीर रुग्ण घेऊन जायचे झाल्यास वेळेवर पोहोचेल, याची शाश्वती नाही. तसेच पडलेल्या खड्डयांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत आहे.

धोकादायक खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे अंग मोकळे होत आहेत. शिवाय जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. धमार्बाद ते मनूर १० किलोमीटरच्या अंतरावर सतराशे साठ खड्डे पडले असून हा रस्ताच खड्डयांनी व्यापला आहे. हा १० किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याने या रस्त्याची किती प्रमाणात दुरवस्था झाली आहे, याचा अंदाज येतो. रस्ता चांगला झाल्यास केवळ १५ ते २० मिनिटात धमार्बादला प्रवाशांना जाता येईल. मात्र खड्डयांमुळे प्रवाशांना १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एक तासाचा वेळ लागत आहे. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडेझुडपे वाढली आहेत.

यामुळे अनेकांना जखमाही सहन कराव्या लागल्या आहेत. धमार्बाद ते मनूर या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा सांगूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. वाढत्या अपघातावर आळा घालण्यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. धमार्बाद ते मनूर या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य असून धमार्बाद ला जाण्यासाठी एक तास लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे महत्वाचे काम असूनही तालुक्याला जाण्यासाठी कंटाळा येत असल्याने जाणे टाळावे लागत आहे. त्यामुळे नुकसानही होत आहे.असे युवा मल्हार सेनेचे नागनाथ जिंकले यांनी सांगीतले.

वालूरमध्ये वारसा स्थळांनी घेतला मोकळा श्र्वास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या