22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeनांदेडपाल्यास मारल्याने शिक्षकास बदडले

पाल्यास मारल्याने शिक्षकास बदडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : अध्यापनाचे कार्य करत असताना शिक्षकाने विद्यार्थ्यास केलेल्या शिक्षेचा राग मनात धरून एका पालकाने शाळेत येऊन संबंधित शिक्षकास बेदम मारहाण केल्याची घटना दिÞ२४ नोव्हेंबर रोजी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे घडलीÞ या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मारहाण करणा-या पालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेÞ जिल्हा परिषद हायस्कूल शाळा माळाकोळी येथे किशोर शंकरराव विधाते हे शिक्षक आहेतÞ ते नेहमीप्रमाणे शाळेत इयत्ता नववीच्या वर्गावर अध्यापनाचे कार्य करत होतेÞ

यावेळी गावातील एकजण तेथे आला आणि विधाते यांना शिवीगाळ करू लागलाÞ तसेच माझ्या मुलास तू का मारले, अशी विचारणा करत त्याने विधाते यांना थापड बुक्क्यांनी मारहाण केलीÞ तसेच ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिलीÞ या प्रकरणी शिक्षक किशोर विधाते यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात मारहाण करणा-या पालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि माणिक डोके हे करीत आहेतÞ या घटनेचा विविध शिक्षक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या