नांदेड : प्रतिनिधी
शहर व परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून, जुन्या वादातून एका ३२ वर्षीय तरूणावर दोघा भावंडांनी पाठलाग करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी नमस्कार चौक भागात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मागच्या दोन-चार दिवसापुर्वीच हॉटेल चालक असलेला अमीर खान दिलवर खान (३२) रा.गोविंद नगर, नांदेड याचा आरोपी शशिकांत भटकळ, गिरीश भटकळ या दोघा भावंडासोबत वाद झाला होता. त्यानंतर मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला. मात्र वाद झाल्याचा राग हा भटकळ बंधूच्या चांगलाच डोक्यात बसला. आणि अमिरखान याच्या नमस्कार चौक भागातील हॉटेलवर जावून गिरीश व शशिकांत हे या दोघा भावंडांनी हातात धारधार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये गेला मात्र त्याचा पाठलाग करत दोन्ही आरोपीनी त्यास तेथेही जावून त्याला मारहाण करण्यात आली.