28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडतेलंगानातील आपघातात कोल्हारीच्या महिलेचा मृत्यु

तेलंगानातील आपघातात कोल्हारीच्या महिलेचा मृत्यु

एकमत ऑनलाईन

शिवणी : किनवट तालुक्यातील कोल्हारी (कोसमेट) येथील आठ जण आत्यविधीसाठ शेषेराव कोम्पलवाड ह्यांच्या नातेवाईका चे निधन झाल्याने आत्यविधीस गेले आसता तेलंगणा राज्यातील आदीलाबाद जिल्ह्यातील इचोडा जवळील सोनपल्ली येथे झालेल्या जिपच्या आपघातात कोल्हारी (कोसमेट) च्या महिलेचा मृत्यु झाला तर तिन महीला गंभी जखमी आसल्याचे समजते.

कोल्हारी (कोसमेट) येथुन अंत्यविधीसाठी जिप क्रमांक एम.एच.२७ – ए.के.२६७० गाडीने २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ :०० वाजता निघाले. ९ च्या दरम्यान बोथ जवळील चिंचोली जवळ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात जमुनाबाई शेषेराव कोम्पलवाड वय ५२ वर्ष राहणार कोल्हारी या महिलेचा जागीच मृत्य झाला. तर त्यातील कमलाबाई जंगेवाड, सुमनबाई करटवाड, सुलनबाई करटवाड या तिघाजणांची प्रकृती चिंताजनक असून अन्य चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना आदीलाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हारी गावावर शोककळा पसरली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या