24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home नांदेड कोवीड योद्धांना रक्षाबंधनाच्या पर्वावर सत्कार

कोवीड योद्धांना रक्षाबंधनाच्या पर्वावर सत्कार

एकमत ऑनलाईन

कंधार :कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणा-या नगर परिषद अधिकारी,कर्मचारी व आरोग्य कर्मचा-यांना कोविड योद्धा म्हणून भाजप महिला मोर्चाच्या वतिने सत्कार करण्यात आला.

नागरीकांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेताना नगरपरिषदेचे अधिकारी व सफाई कर्मचारी,आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी,पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी व पत्रकार बांधव आपल्या परिवाराची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

या कोरोना योद्धांचा सन्मान भाजप महिला मोर्चाच्या वतीने दि.7 ऑगस्ट रोजी कंधार येथे करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील गोरे ,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, उपनगराध्यक्ष म.जफरोद्दीन बाहोद्दीन यांची उपस्थिती होती. उपानगरध्यक्ष म.जफरोद्दीन बाहोद्दीन यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर ही वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,नगरसेवक सुनील कांबळे,उपाध्यक्ष सुनंदा वंजे, माजी नगरसेविका वंदना डुंमणे रमाबाई व्यवहारे, चेतन केंद्रे,मधुकर डांगे,राजहंस शाहपुरे,बालाजी तोटावाड,उमेश भुरेवार,ंगरजकर आदी उपस्थित होते.

Read More  जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या २०३० वर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या