18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडजिल्हातील टॉप १० मध्ये कुंडलवाडी आरोग्य केंद्राचा समावेश

जिल्हातील टॉप १० मध्ये कुंडलवाडी आरोग्य केंद्राचा समावेश

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत आजपर्यंत १६ हजार ८४२ जणांनी लस घेतली असून या लसिकरण मोहिमेत कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे जिल्हातील टॉप १० यादीत नाव समाविष्ट केले तरबिलोली तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अव्वल ठरले आहे.तर आरोग्य केंद्राची उद्देश पुर्तीकडे वाटचाल.

सध्या कोरोनाची तीसरी लाट येण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असल्याने आरोग्य विभागाकडून लसिकरण मोहिमेला वेग आला आहे.आरोग्य कर्मचारी,सेवाभावी संस्था यासाठी पुढाकार घेत जनजागृती करत , जागोजागी लसिकरणाचे बूथ उभारले तसेच गणेश उत्सवा काळात अनेक गणेश मंडळाच्या ठिकाणी लसिकरणाचे कॅम्प आयोजित करुन लसिकरण करुन घेण्यात आले.या मोहिमेत कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर यांनी लसिकरणासाठी गणेश मंडळाच्या पदाधिका-्यांना कॅम्प आयोजित करण्याची विनंती केली.यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने प्रोत्साहन देण्यासाठी लसिकरण वाढण्यासाठी बक्षीस पण ठेवत लसिकरण करुन घेत त्यांनी लसिकरणाचा टक्का वाढविला.

आजपर्यंत ६६ टक्यांवर लसिकरण झाले असून संपुर्ण नांदेड जिल्हातील टॉप १०यादीत कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश तर बिलोली तालुक्यातील पाच प्राथमिक अरोग्य केंद्रात प्रथम आहे.या लसिकरणाचे प्रमाण जास्त होण्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण ठक्करवाड रूग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा वैद्यकीय अधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली.समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.कसबे,डॉ.स्मिता पाटील,डॉ.रुबिया पठान,डॉ.नागरगोजे,डॉ.योगिता भागे , डॉ हुलसरे , आरोग्य सहाय्यक जाधव , सावंत , डॉ.विनोद माहुरे , डॉ.नरेश बोधनकर , अंगद मुंडे , जाधव , देवकांबळे सिस्टर , जयराज शिंदे , श्रीकांत अमेटवार ,बंदना ऐगडे सिस्टर , श्रीमती कल्लूरे , करड़े सिस्टर ,वाहन चालक दत्ताहरी कदम , सर्व आरोग्य कर्मचारी,गणेश मंडळाचे पदाधिकारी , नगर परिषद कर्मचारी , ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते.यापुढे पण लसिकरणाच्या मोहिमेची गती बाढवून १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या