19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home नांदेड कुंडलवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

कुंडलवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

1ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष निवड प्रक्रिया पार पाढणार, नगरसेवकातून केली जाणार नगरध्यक्षाची निवड

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी (मोहम्मद अफजल) : येथील नगरपालिकेचे नगराध्यक्षा डॉ.सौ.आरुणा कुडमूलवार यांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अनर्ह ठरवण्यात आल होते,या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक दि. 1 ऑक्टोम्बर रोजी सकाळी 11 वाजता नगरसेवकांची विशेष सभा बोलावून घेण्यात येणार आहे.

कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.आरुणा विठ्ठल कुडमूलवार हे नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओ बी सी ) महिला या प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांना दि. 7 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने अनर्ह केले होते.या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जिल्हाधिकारी यांनी जाहिर केला आहे.

त्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे नामनिर्देशनपत्र मुख्याधिकारी नगरपरिषद कुंडलवाडी यांच्याकड़े दाखल करायचे आहे.
नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारण्याचा दि.21सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजे पर्यंत,
पीठासीन आधिकाऱ्याकडून नामनिर्देशनपत्राची छाणनी करणे,नामनिर्देशनपत्र फेटाळनी करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे सुचना फलकावर प्रसिद्ध करणे
दि. 21 रोजी दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंत,नामनिर्देशनपत्र स्वीकारणे अथवा नाकारणे संबंधीच्या निर्णयामुळे उमेदवारास मा.प्रादेशिक संचालक नपाप्र औरंगाबाद यांच्याकड़े आपील कारावयाचा कालावधी
दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून पुढील 48 तास,मा.प्रादेशिक संचालक नपाप्र औरंगाबाद यांच्याकड़े प्राप्त झालेल्या आपीलावर सुनावणी घेऊन निर्णयासाठी राखीव
दिनांक 24 ते 28 सप्टेंबर पर्यंत वैद्य नामनिर्देशनपत्राची यादी सुचना फलकावर प्रसिद्ध करणे दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेणे दि. 30 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत , निवडणूक विशेष सभा दि. 1 ऑक्टोम्बर सकाळी 11 वाजता नगरसेवकांची विशेषसभा त्यात अध्यक्षांची निवड होणार.

आशा पद्धतीने निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणुन बिलोली उपविभागीय अधिकारी हे काम पाहणार.हि थेट जनतेतून न होता हि निवडणूक नगरसेवकातून होणार असल्यामुळे या निवडणुकीत आर्थीक महत्व प्राप्त तर होणार ? पक्षश्रेष्टिने ठरवलेल्या उमेदवाराला नगरसेवक निवडतील का? याकडे नागरीकांचे लक्ष.  एकंदरीत कुंडलवाडी नगरपरिषदेत एकूण सदीसंख्या 17 आहे त्यापैकीभाजप 10, शिवसेना 03,काँग्रेस 4 हि संख्या पाहता सत्ताधारी भाजपाकड़े बहुमताचा आकड़ा असून भाजपाकड़े नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओ बी सी ) महिला या प्रवर्गाचे तीन उमेदवार आहेत त्यातून एकाची निवड नगराध्यक्ष म्हणुन केली जाणार हे मात्र निश्चित ?

शेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर, विरोधकांच्या गोंधळातच मतदान पूर्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या