20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeनांदेडकुष्णूर जुगार अडडा प्रकरण : ठाणे प्रमुख अडचणीत

कुष्णूर जुगार अडडा प्रकरण : ठाणे प्रमुख अडचणीत

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा : कुष्णूर पंचतारांकित औधोगिक वसाहतीत चालविला जाना-यां हायप्रोफीईल जुगार अड्यावर कुटूंर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी मारलेल्या धाडी नंतर जप्त केलेल्या रक्कम व या ठीकानी एवढा मोठा जुगार अड्डा स्थानिक पोलीसाच्या परवानगी शिवाय चालुच शकत नसल्याचे मत प्रवाह समोर आल्याने या सर्व प्रकरणाचा तपास बिलोली चे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्देस्वर धुमाळ हे करीत असल्याने कुटूंर ठाणे प्रमुख व बीट प्रमुख अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स.पो.नि.करीम पठाण यांनी कुंटूर पोलीस ठाण्याचे सुत्रे हाती घेतल्या पासुन या परिसरात सर्व अवैध धंदै सुरू झालै आहेत.काहाळा बु हे ठिकाण तर मटका गुटखा अवेध देशी दारू विक्री चा आड्डाच बनले आहे . नांदेड हैद्राबाद महामार्गावर कुंटूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणा-या कुष्णूर येथील औधोगिक वसाहतीत अगदी हायप्रोफीईल चालणा-या या जुगार अड्यावर नांदेड शहरासह सहा तालुक्यातील नामांकित जुगारी हायफाय चारचाकी वहाणातुन येत असत या ठिकाणी पाच पन्नास लाखांची नियमीत उलाढाल अंदर बहार,तिर्रट व रम्मीचा जुगारावर खेळल्या जात होता.सदर जुगार अड्डा हा पोलिसांच्या परवानगीने भाजपा कार्यकर्ता आपल्या सहकार्याच्या मदतीने चालवित आसल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सेफ जागा म्हणूनच जुगार खेळण्यासाठी या ठिकाणी खेळाडू येत होते.

एकाच वेळी दोन ते तिन ग्रुप खेळण्याची सोय असल्याने पंचविस ते पन्नास जनाचा डाव चालत असल्याने नियमीत लाखाच्या जवळ पास केटी काडली जात होती. या वरून हप्त्याच्या आकड्यांचा अंदाज येवू शकतो.माधव नावाने ओळखला जाणारा चालक सर्व आर्थिक व्यवहार पहात असल्याचे समोर आल्याने तपासायची सुत्र हाती घेताच डॉ. धुमाळ यांनी या महारथीची दोन वेळा कसून चौकशी केल्याचे समोर आले आहे.जागेचा मालक व अड्डा चालक शेख वल्ली यांच्या वर गुन्हा दाखल न करता केवळ पंचवीस जनावर कार्यवाही करण्यात आली होती सदर प्रकार धुमाळ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास आदेश दिले होते.व जागा मालक यांच्या वर दोन दिवसा नंतर गुन्हा दाखल करावा लागला होता.विशेष म्हणजे जुगार अड्ड्यावर धाड पडण्या अगोदर काही तास एक पोलीस जमदार या जुगार अड्ड्यावर जाऊन आल्याची चर्चा ही होत आहे.

या जुगार अड्यावर दि.२९ मे रोजी टाकलेल्या धाडीत ३ लाख २१हजाराची रोख रक्कमे सह तिन चार चाकी व आठ दुचाकी सह १७ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवण्यात आले असले तरी रोख रक्कम ही फार मोठी होती अशी चर्चा धाडी नंतर सुरू झाली.सदर जुगार अड्याची किर्ती पोलीस अधिक्षका प्रयत्न त्यांच्या गोपणीय सूत्रांनी दिल्याने साहेबांचे विशेष पथकाने धाड मारल्यास हे प्रकरण आपणास शेकणार या भिती पोटी ही कार्यवाही कुंटूर पोलीसांनी केल्याचा मत प्रवाह समोर आला आहे.पोलीस उप अधिक्षक धुमाळ यांच्या तपासात काय निष्पन्न होते ते लवकरच समोर येणार आहे .

कुंटूर ठाण्यात कर्तव्य बजावत असताना स.पो.नि.करीम पठाण हे आपली मनमानी करतात .तसेच अवैध धंद्याना मुक संमती देतात .पोलीस ठाण्याच्या हद्दीत जातीय तेढ निर्माण करणे ,खोट्या गुन्हयात नागरिकांना गोवणे असा कारभार या ठाण्याचा चालत आहे तरी या बाबत चौकशी करून ठाणे प्रमुखांना निलबित करा अशी लेखी तक्रार आ.राजेश पवार यांनी पोलीस अधिक्षकाकडे केले होते या बाबत उप अधिक्षक निलेश मोरे यांनी चौकशी करून अहवाल पोलीस अधिक्षक यांच्या कडे सादर करून बरेच दिवस झाले पण या बाबत काय झाले हे अद्याप कळाले नाही .त्यामुळे सदर चौकशी गुलदस्त्यातच राहील की असे तरी सध्या वाटत आहे.

भाजपला वर्षभरात मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या