23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडऑनलाईन शिक्षणाबाबतीत नियोजनाचा अभाव

ऑनलाईन शिक्षणाबाबतीत नियोजनाचा अभाव

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : यंदाच्या वर्षी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत शिक्षण विभागाने १५ जून पासून शाळा भरविण्यास सुरुवात केली असून शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करीत ऑनलाईन पध्दतीने अध्यापनाचे आदेश देण्यात आले असले तरी ग्रामीण भागात असलेल्या असुविधेचा आभाव, गटसाधन केंद्राचे परिपूर्ण नसलेले नियोजन यासह अनेक बाबतीत उणीवा असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा लाभ ग्रामीण विद्यार्थ्यांना कितीपत मिळेल याबाबतीत सर्वकाही अनभिज्ञच आहे.

ग्रामीण भागात खासगी संस्था व जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले जात असे गतवर्षी २२ मार्च पासून अचानकपणे कोरोना चे आगमन झाले तेंव्हा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बंद पडली परिणामी ग्रामीण भाग अगोदरच शैक्षणिक बाबतीत कमकुवत होता आणि या संकटाने तर शिक्षण क्षेत्राचे अतोनात नुकसान केले. बंद असलेल्या शाळा यंदा पुन्हा १५ जून पासून पूर्वीप्रमाणे उघडल्या असल्यातरी शाळेतून मिळणारे शिक्षणाचे धडे आता ऑनलाइन घ्यायचे म्हणजे विविध समस्यातुन मार्गक्रमण करीत असताना नवे संकट उभे राहण्यासारखेच म्हणावे लागेल.

झूम अ‍ॅप्स, गूगल मिट, दूरचित्रवाणी या सारख्या नव्या तंत्रज्ञानाची ग्रामीण भागात प्रकषार्ने उणीव जाणवते तसेच ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल व इतर टेक्निकल सुविधा नाहीत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत व ज्या ज्या भागात नेट कनेक्टिव्हिटी नाही त्या भागात हे शिक्षण काय उपयोगाचे ठरणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच राहत आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील कांही खाजगी संस्था प्रवेश प्रक्रिया सुरू केली व शैक्षणिक फी,ट्युशन फी असे शुल्क भरून घेणे सुरुवात केले असले तरी शिक्षणाचे पुढील नियोजन काय असा प्रश्न पालक उपस्थित करताच केवळ शासनाच्या आदेशाची वाट बघा असे उत्तर देण्यात येत आहे.ऑनलाइन शिक्षणाबाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना व नियोजन आहे याबाबत माहिती घेण्यासाठी गटसाधन केंद्राशी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही.

रामपूरचा पॅटर्न ठरला सर्वोत्कृष्ट
तालुक्यातील रामपूर या छोट्याशा गावी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगीशल शिक्षक नंदूकुमार राजमले यांनी गतवर्षी एक वेगळा प्रयोग केला लॉकडाऊन मुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाशी कायम जुळवून ठेवत उपक्रम सुरू केला व जवळजवळ ३५० दिवस घरातूनच शाळा व दर आठवड्याला सुपर संडे असा प्रयोग करून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अल्प वापरातुन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले विशेष म्हणजे याचा लाभ शाळेतील ३७ विद्यार्थ्यांसह गावातील ९१ विद्यार्थ्यांना झाला ४ मे २०२० पासून सुरू केलेला हा उपक्रम ३५० दिवस निशुल्क चालविला परिणामी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची परिपूर्ण माहीती मिळाली व विद्यार्थी हा नवा बदल स्वीकारत शिक्षणाशी जुळून राहिले.या उपक्रमाचे नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कैतुक केले होते.

कृषि विधेयकावरील चर्चेसाठी केव्हाही तयार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या