23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडचिखली सोसायटीच्या चेअरमनपदी ललिताबाई पाटील चिखलीकर

चिखली सोसायटीच्या चेअरमनपदी ललिताबाई पाटील चिखलीकर

एकमत ऑनलाईन

नांदेड (प्रतिनिधी) : लोहा तालुक्यातील चिखली सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत भाजपाचे युवा नेते प्रवीण पाटलांचे नेतृत्व विरोधकांना पडले भारी आहे. सोसायटीच्या चेअरमनपदी ललिताबाई सुभाषराव पाटील चिखलीकर यांची तर व्हाइस चेअरमनपदी विलास नारायणराव कदम यांची बिनविरोध निवड करून बाजी मारली

चिखली सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ही निवडणूक अटीतटीची होईल असे काही जणांना वाटत असतानाच भाजपचे खाÞ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे सदस्य तथा युवा नेते भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर व सचिन पाटील चिखलीकर यांच्या देखरेखीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली. ललिताबाई सुभाषराव पाटील चिखलीकर, विलास नारायणराव कदम, प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर, मोहनराव रोकडोजी कदम, रूद्राजी सर्जेराव कदम, व्यंकटराव शेषराव पवळे, अशोक संभाजी पवळे, पांडुरंग व्यंकटराव कदम, पारूबाई मारोती कदम, माधव शंकरराव कांबळे आणि सुर्यकांत नागोराव करेवाड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व गावक-यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला, तो हिताचा ठरलाÞ निवडुन आलेल्या सदस्यांतून सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सवार्नुमते ललिताबाई सुभाषराव पाटील चिखलीकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी विलास नारायणराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून काकडे आणि तेलंग यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व सदस्यांचे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर, ऍड. संदीप पाटील चिखलीकर, नगरसेवक कृष्णा पांिपंवर मनोहर पाटील गायकवाड, शरद पाटील कदम, मोहन नामदेवराव पवळे, साहेबराव चिखलीकर, सरपंच साहेबराव पोटफोडे उपसरपंच अच्युतराव पवळे दिगंबर राव पोलीस पाटील पवळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करुन स्वागत केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या