23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडनांदेड-जालना समृध्दी महामार्गाचे भूसंपादन लवकरच

नांदेड-जालना समृध्दी महामार्गाचे भूसंपादन लवकरच

एकमत ऑनलाईन

नांदेड: राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन संपादन करण्यासाठी पुढील आठवड्यात नांदेड-जालना- हिंगोली-परभणी या चार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यासंदर्भात अधिसूचना जारी करतील त्यानंतर भूसंपादनाच्या कारवाईला प्रारंभ होईल. हा रस्ता राज्य रस्ते महामंडळाच्या इतर रस्त्याप्रमाणे दर्जेदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती नांदेडचे भूमिपुत्र तथा रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी एकमतशी बोलतांना दिली.

जानेवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गातंर्गत जालना ते नांदेड तिस-या टप्प्यातील आठ पदरी रस्त्याला मान्यता दिली होती. यासाठी ५ हजार ५00 कोटी खर्च करण्यात येणार आहे. १९४ कि.मी.चा हा महामार्ग असून जवाहरलाल नेहरु ट्रस्ट मुंबईला तो जोडला जाणार आहे. हा मार्ग निर्माण करण्यासाठी नांदेडचे भूमिपुत्र राधेश्याम मोपलवार, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, हणमंतराव आरगुंडे हे अधिकारी परिश्रम घेत आहेत. जलद वाहतुकीची व्यवस्था तसेच दळणवळणाची तातडीची व्यवस्था व्हावी यासाठी या महामार्गाचे नियोजन सध्या सुरु असून जालना ते नांदेड या मार्गावरुन हा रस्ता आणखी जवळ कसा होईल यासाठी बुधवारी व्यवस्थापकीय संचालक मोपलवार यांनी आपल्या टिमसह जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या रस्त्याची पाहणी केली.

नांदेड ते पाथरी या मार्गावरच्या पाहणीनंतर मराठवाड्यातील दळणवळणाच्या सोई व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या अराखड्याची सध्या वेगाने वाटचाल चालु आहे. समृध्दी महामार्गाच्या अंतर्गत जालना ते नांदेड या आठपदरी रस्त्याच्या कामासाठी अधिसूचना पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता मोपलवार यांनी व्यक्त केली आहे. राधेश्याम मोपलवार यांना सहा महिन्याची मुदतवाढ नुकतीच मिळाली असून त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी या कामाला गती दिली आहे. रस्ते विकास महामंडळातील अनेक अधिका-यांनी पाहणी केली असून यावेळी नांदेडचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांची देखील अवर्जून उपस्थित होती.

एकाच रात्री तिन घरे फोडले ; ६ लाखासह दागिने लंपास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या