23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडकंधार तहसीलच्या नव्या इमारतीला गळती

कंधार तहसीलच्या नव्या इमारतीला गळती

एकमत ऑनलाईन

कंधार : कोट्यावधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीस जागोजागी गळती लागल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे ज्या हॉलमध्ये जास्त पाणी गळत आहे. त्या ठिकाणी फरशीवर गळालेले पाणी सर्वत्र पसरू नये यासाठी कठडा बांधण्यात आल्याचा अजब प्रकार दिसून येत आहे.

कंधार तहसील कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्याने चार- पाच वर्षां पूर्वी जुनी इमारत पाडून त्याच जागेवर नवीन भव्य इमारत बांधण्यात आली. ही इमारत होताना येथील कांही राजकारण्यांनी बांधकाम सुरू होण्या आधीच अनेक अडथळे निर्माण के ले होते. सर्व विघ्न दूर करत या इमारतीचे काम पूर्ण झाले. तालुक्याच्या विकासात भर घालणारी कोटयावधी रुपये खर्च करण्यात आलेली ही नवी इमारत दजेर्दार व गुणवत्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र संबंधित गुतेदार व अधिका-यांच्या मनमानी मुळे कांही वर्षातच या इमारतीच्या गुणवतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या इमारती मागील विघ्न अजुन संपले नसल्याचे दिसुन येत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन करण्यात आले होते. भव्य बांधण्यात आलेल्या या तहसील इमारतीत अनेक ठिकाणी पावसाळ्यातील पाणी झिरपत आहे. कांही ठिकाणी तर भिम व भिंती यात भेगा पडल्याचे दिसुन येते. त्यातुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गळत आहे. एव्हढेच नव्हे तर अधिकचे पाणी गळत असलेल्या रेकॉड रूम,हॉलमध्ये पाणी सर्वत्र पसरू नये म्हणून ज्या ठिकाणी पाणी गळत त्या ठिकाणी फरशीवर सिमेंटचा कठडा बांधण्यात आला आहे. दोन दिवसा पूर्वी झालेल्या पावसा मुळे तर तहसील कार्यालयाच्या गळतीची सर्वत्र चर्चा होत आहे.

तहसील कार्यालया प्रमाणेच तहसीला लागुनच बांधण्यात आलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीची तीच अवस्था झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आणुन येथील नगरसेवक सुधाकर कांबळे यांनी याची चौकशी करून संबंधित अधिकारी व गुतेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. कांही वर्षातच जागो जागी झिरपत असलेल्या तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारती किती दिवस टिकतील याचा अंदाज नाही. यासाठी दोन्ही कार्यालयाच्या बांधकामा नंतर कांही वर्षातच कामाची गुणवत्ता उघडकीस आलेल्या गुतेदारास नवीन होणा-या उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम करू देऊ नये अशी लेखी मागणी तहसीलदार यांच्याकडे कांबळे यांनी केली होती.

त्यानंतर तहसीलदार यांनी कंधारचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता यांना तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालय इमारत बांधकामा संदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यास ही जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्या इमारतीवर उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. कामाच्या गुणवते बाबद तक्रार असलेल्या त्याच गुतेदारा मार्फत बांधकाम सुरू असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या